जिल्ह्यातील मेळघाटमधील धारणी तालुक्यातील मोकरदा या गावात हा प्रकार घडला. इथे अवघ्या एका दिवसाचं नवजात बाळ नाल्यात आढल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला नाल्यात फेकून दिलं. इतकंच नाही तर तिने बाळाच्या अंगावर गवताचा भार टाकल्याचा धक्कादायक प्रकार मेळघाटमध्ये घडला आहे.
गुहेतून यायचा घंटीचा आवाज; 3 महिन्यांनी असं काही बाहेर आलं की अख्खं गाव थरथर कापू लागलं
advertisement
अवघ्या एक दिवसाच्या नवजात बाळाचा रडण्याचा आवाज नाल्यातून आला. त्यानंतर मात्र स्थानिक नागरिक नाल्याजवळ गेले. यावेळी या ठिकाणी नवजात अभ्रक आढळून आलं. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाळाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं आणि अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या बाळावर आता धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अज्ञात महिलेचा शोध पोलीस घेत आहे. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सावंतवाडीच्या जंगलात अमेरिकन महिलेला बांधलं -
सावंतवाडीच्या जंगलातूनही एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. यात सावंतवाडीच्या रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात दोन दिवसांपूर्वी एक अमेरिकन महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली होती. गुराख्याने हे पाहताच पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल करत पुढील तपास सुरू केला होता. आता या प्रकरणात त्या अमेरिकन महिलेच्या सुरुवातीच्या जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
