स्पा-मसाज सेंटरमध्ये पोलिसांनी धाड टाकली तेव्हा त्यांना बाथरूममध्ये काही अंडरगारमेंट्स आढळून आली. अमरावती शहरातील मध्यवस्तीत असा प्रकार सुरू असल्याने लोकप्रतिनिधींनीही संताप व्यक्त केलाय. आता या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्यानंतर कारवाई केली गेली.
मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सिटी कोतवाली पोलिसांनी यानंतर धाड टाकताच धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तरुणाईचे अश्लील चाळे सुरू होते. पोलिसांना एका माजी नगरसेवकाने स्पा मसाज सेंटरमध्ये अवैध धंदा सुरू असल्याची माहिती दिली होती. लोकप्रतिनिधीने याबाबत स्पामधील कर्मचाऱ्यांसह मालकालासुद्धा समज दिली होती. शेवटी पोलिसांत तक्रार दिली. आता या प्रकरणात चार तरुण आणि तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 12, 2024 12:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Amravati : स्पा, मसाजच्या नावाखाली गोरखधंदा; बाथरुममध्ये अंडरगारमेंट्स, तरुणी सापडल्या अशा अवस्थेत
