अनिषा माजगावकर इच्छुक असलेली जागा युतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला गेली होती. त्यामुळे अनिषा माजगावकर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. भांडुपमधील प्रभाग क्र. ११४ मधून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावर उतरलेल्या अनिषा माजगावकर या सर्वाधिक मते मिळविणाऱ्या अपक्ष उमेदवार ठरल्या.
शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवार राजुल पाटील यांनी अनिषा माजगावकर यांना पराभूत केले. अनिषा माजगावकर यांना ८०५५ मते मिळाली. राजुल पाटील यांनी साडे तीन हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला.
advertisement
निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजगावकर यांनी मुंबई अध्यक्ष या नात्याने संदीप देशपांडे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. निवडणूक आणि प्रचार काळातील अनुभव माजगावकर यांनी संदीप देशपांडे यांना सांगितले.
खासदारांच्या लेकीकडून माजगावकर यांचा पराभव
महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्याने माजगावकर यांनी बंडखोरी केली. मनसेने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु माजगावकर निवडणूक लढविण्यावर ठाम होत्या. शिवसेनेचे खासदार संजय दीना पाटील यांची मुलगी राजुल पाटील आणि माजगावकर यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली. या लढतीकडे मुंबईकरांचे लक्ष लागले होते. महापालिकेच्या २०१२ सालच्या निवडणुकीत अनिषा माजगावकर निवडून आल्या होत्या.
