आंदोलनाचा फायदा केजरीवाल यांनी घेतलाय का?
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली जनतेला आवाहन केलं. जनतेने उमेदवार पाहावा शुद्ध आचार, शुद्ध विचार, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग, अपमान पचवण्याची शक्ती हे गुण ज्या उमेदवारांमध्ये आहेत, अशाच उमेदवारांना मतदान करा, असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलं आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा केजरीवाल यांनी घेतलाय का? यावरती बोलताना अण्णा हजारे म्हणाले, मी तसं कोणावर आरोप करत नाही. त्याला करायचं ते त्यांनी केलं. जसं करतील तसं ते भोगतील. त्याचं कर्तव्य त्याच्या हातात आहे, अण्णा हजारे म्हणाले.
advertisement
अण्णा हजारे यांना सामाजिक गौरव पुरस्कार
स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या संस्थेकडून दिला जाणारा सामाजिक गौरव पुरस्कार अण्णा हजारे यांना जाहीर झाला. त्यावर बोलताना अण्णा हजारे यांनी आनंद व्यक्त केला. मी लहान असताना आईने माझ्यावर केलेले संस्कार म्हणजे सामाजिक बांधिलकी. स्वामी विवेकानंद महात्मा गांधी यांच्या विचाराचा प्रभाव आणि आयुष्याचा निर्णय घेतला जनतेची सेवा करायची. गाव समाज देशाची सेवा करायची असा निर्णय घेतला आता 90 वर्षे झाले फक्त झोपण्याचा विस्तार आणि जेवणाचं ताट आहे. बँक अकाउंट कुठे असतं माहित नाही कुठेच बँकेत पैसे नाहीत. आयुष्यात फक्त सेवा करायची गावाची देशाची सेवा करायची सेवेचा सेवेचा अर्थ निष्काम कर्म फळाची अपेक्षा न करता निष्काम भावनेनं ने केलेले कर्म ईश्वराची पूजा असते.
चेहऱ्यावरचं समाधान हा आपला आनंद
दरम्यान, आज मी 90 वर्षाच्या वयात माझा आनंद एवढा असतो शब्दांनी व्यक्त होत नाही दुःख उरलं नाही. त्यामुळे आनंदच आनंद आहे दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा समाधान हा आपला आनंद असतो. संतांनी सांगितले आहे की तुम्हाला आनंद हवाय का तुम्हाला सुख हवय का आधी दुसऱ्यांना सुखी करा जेवढे तुम्ही दुसऱ्यांना सुखी करताना तेवढा आनंद तुम्हाला मिळेल.