लातूर : अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, यानंतर अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे किती आमदार जाणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख हे दोन्ही देशमुख बंधू बाभळगावच्या त्यांच्या गडीवरून बाहेर पडलेले नाहीत.
लातूर शहरात 100 वे विभागीय नाट्य संमेलन सुरू आहे, त्यात प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार अमित देशमुख यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेवर होतं, पण तरीही अमित देशमुखांनी गडी सोडली नाही. आजच्या आयोजित परिसंवादामध्येही अमित देशमुखांचं नाव होतं. सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर आणि न्यूज 18 लोकमतचे एँकर विलास बडे यांना प्रश्न विचारणार होते.
advertisement
विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरेंचा पराभव करणारा मास्टरमाईंड कोण? नाना पटोलेंचा गौप्यस्फोट
परिसंवादाच्या कार्यक्रमाला संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्हॅलनन्टाईन डेच्या निमित्त देशमुखांना देण्यासाठी गुलाब आणला होता, पण अमित देशमुखांनी कार्यक्रमाला पाठ फिरवल्यामुळे निलंगेकर यांनी देशमुखांसाठी आणलेलं गुलाबाचं फूल आयोजकांकडे दिलं आणि देशमुखांपर्यंत पोचोवण्याची विनंती केली, यामुळे लातूरच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
