Congress : विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरेंचा पराभव करणारा मास्टरमाईंड कोण? नाना पटोलेंचा गौप्यस्फोट
- Published by:Shreyas
Last Updated:
काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेले चंद्रकांत हांडोरे हे विधान परिषदेत पराभूत झालेले उमेदवार आहेत. त्यावेळी जिंकण्याची 100 टक्के खात्री असताना हांडोरे अंतर्गत राजकारणामुळे पडले होते.
प्रणाली कापसे, प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे, महाराष्ट्रातून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. हांडोरेंचं नाव जाहीर होताच गेल्या विधान परिषद निवडणुकीतील त्यांच्या परावभाचा विषय चर्चेला आला, त्यामुळे त्या पराभवाची खपली काढली गेली. विधान परिषदेत हरणाऱ्या उमेदवाराला राज्यसभेवर कसं पाठवणार? असा सवाल उपस्थित करताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘हांडोरेंना पाडणारा मास्टर माईंड आज आमच्या पक्षात नाही, असं उत्तर देताना पटोलेंचा रोख अशोक चव्हाणांकडे होता हे उघड आहे, त्यावेळी विधान परिषदेसाठी काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते ,चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप.
advertisement
निवडणुकीत पक्षाने ठरवल्याप्रमाणे चंद्रकांत हांडोरे यांना पहिल्या प्राधान्याची 29 मतं देण्याचं ठरलं होतं, तर भाई जगताप यांना 18 मतं मिळणार होती, तर 29 आमदरांनी भाई जगताप यांना दुसऱ्या प्राधान्यांची मते द्यायची होती. या रणनिती प्रमाणे काँग्रेसचे दोन्ही उमेदावर जिंकून आले असते. प्रत्यक्षात मात्र छुपे मतदान असल्याने हांडोरे यांची सहा मतं फुटली, त्यातील काही मतं ही भाई जगताप यांना मिळाली. परिणामी चंद्रकांत हांडोरे यांना पहिल्या पसंतीची 23 आणि भाई जगताप यांना 22 मतं पडली. निवडून येण्यासाठी लागणारी 28 मतं काँग्रेसच्या दोन्ही उमेदवाराला मिळाली नाही, त्यामुळे दुसऱ्या प्राधान्यांच्या मतांची मोजणी करण्यात आली, त्यात भाई जगताप यांना हांडोरेंपेक्षा जास्त मते पडली, म्हणून भाई जगताप जिंकून आले.
advertisement
काँग्रेसच्या उमेदवाराने काँग्रेसच्याच उमेदवाराचा भाजप बरोबर मिळून पाडाव केला होता. या सगळ्या खेळाचे मास्टर माईंड अशोक चव्हाण होते, असा आरोप नाव न घेता नाना पटोले यांनी केला आहे. भाई जगताप यांचे पक्षातील वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत. शिवाय विरोधी पक्षात नातेवाईक सुद्धा, त्याच नातेगोत्याचा आणि चांगल्या संबंधाचा फायदा भाई जगताप यांनी करुन घेतला आणि आमदारकीची माळ स्वत:च्या गळ्यात पाडून घेतली, पण काँग्रेसने मात्र राज्यसभेच्या जागेसाठी चंद्रकांत हांडोरे यांचा विचार करुन त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर केला आहे. शिवाय आता राज्यसभेची निवडणुक बिनविरोध होणार असल्याने चंद्रकांत हांडोरे खासदार झाल्यात जमा आहे. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या पक्षनिष्ठेचे पारितोषीक त्यांना मिळाले आहे, असं म्हणावं लागेल. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा राग डोक्यात ठेवून त्यांनी पक्ष सोडला नाही, पण पक्षाने ज्यांना सगळं काही दिलं ते अशोक चव्हाण मात्र पक्ष सोडून गेले, असा टोला नाना पटोलेंनी हाणला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 14, 2024 9:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Congress : विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरेंचा पराभव करणारा मास्टरमाईंड कोण? नाना पटोलेंचा गौप्यस्फोट







