TRENDING:

Ashok Hande: 'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर कार्यालयात घुसून हल्ला, माटुंग्यातील घटनेने सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ

Last Updated:

Ashok Hande: मराठी बाणा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जगभरात पोहोचवणारे ज्येष्ठ लोककला अभ्यासक अशोक हांडे यांच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: 'मराठी बाणा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संस्कृती जगभरात पोहोचवणारे ज्येष्ठ लोककला अभ्यासक अशोक हांडे यांच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्किंगच्या शुल्कावरून झालेल्या वादातून एका ५३ वर्षीय व्यक्तीने हांडे यांना बॅटने मारहाण केली. या प्रकरणी माहीम पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल केला आहे.
'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर कार्यालयात घुसून हल्ला, माटुंग्यातील घटनेने सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ
'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर कार्यालयात घुसून हल्ला, माटुंग्यातील घटनेने सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ
advertisement

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १ मार्च रोजी माटुंगा (पश्चिम) येथील मनमाला टँक रोडवर घडली. अशोक हांडे हे युनायटेड हाऊसच्या तळमजल्यावर असलेल्या आपल्या कार्यालयात बसले होते. यावेळी स्थानिक रहिवासी प्रथमेश पांडुरंग उनफोडे उर्फ बंटी (५३) हातात क्रिकेटची बॅट घेऊन तिथे पोहोचला. त्याने कार्यालयाच्या काचेवर बॅटने प्रहार करण्यास सुरुवात केली.

advertisement

आवाज ऐकून हांडे बाहेर आले असता, प्रथमेशने तेथे उभ्या असलेल्या 'मराठी बाणा'च्या गाड्यांसाठी पार्किंगचे पैसे मागण्यास सुरुवात केली. संबंधित जागेचा आणि प्रथमेशचा कोणताही कायदेशीर संबंध नसल्याने हांडे यांनी पैसे देण्यास नकार दिला. याचा राग अनावर झाल्याने आरोपीने त्यांना शिवीगाळ करत बॅटने हल्ला केला. या हल्ल्यात हांडे यांच्या कानाजवळ दुखापत झाली आहे.

advertisement

पोलिसांशीही हुज्जत

कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी अधिकच आक्रमक झाला. घटनेची माहिती मिळताच माहीम पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आश्चर्याची बाब म्हणजे, आरोपीने पोलिसांनाही जुमानले नाही. त्याने पोलिसांशीही हुज्जत घालत त्यांना अपशब्द वापरले आणि त्यांच्या अंगावर धावून गेला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

पोलिसांनी आरोपी प्रथमेश उनफोडे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर मारहाण, धमकी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Hande: 'मराठी बाणा' फेम अशोक हांडे यांच्यावर कार्यालयात घुसून हल्ला, माटुंग्यातील घटनेने सांस्कृतिक क्षेत्रात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल