राजकारणी आणि बड्या अधिकाऱ्यांचे 'वरदहस्त'?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने हे १५०० कोटींचे साम्राज्य एकट्याने उभे केलेले नाही. यात अनेक बडे सरकारी अधिकारी आणि बड्या राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याची दाट शक्यता आहे. या 'बड्या' मंडळींच्या मदतीनेच खरातने अल्पावधीत इतकी मोठी मालमत्ता जमवली. पोलीस आता या 'बॅकएंड' सपोर्टरचा शोध घेत आहेत.
नॅटग्रीडने उघडले आर्थिक गुपित
advertisement
सायबर विभागाने खरातच्या सर्व बँक व्यवहारांची माहिती 'फास्टट्रॅक' स्वरूपात मिळवण्यासाठी नॅटग्रीडकडे पत्रव्यवहार केला होता. या माहितीच्या आधारे खरातची प्रॉपर्टी कुठे-कुठे आहे, याचे कच्चे आराखडे तयार करण्यात आले आहेत. खरातने जमवलेली ही संपत्ती केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून, ती इतर शहरांतही पसरल्याचा संशय आहे.
लक्झरी लाईफ अन् राजवाड्यासारखं फार्महाऊस
खरातचे राहणीमान एखाद्या राजासारखे होते. त्याची विलासी जीवनशैली आणि शहराबाहेर असलेले त्याचे विशाल फार्महाऊस पाहूनच त्याच्या संपत्तीचा अंदाज येतो. ओकस प्रॉपर्टीजच्या नावाखाली चालणाऱ्या या व्यवहारांतून कोट्यवधींची काळी माया पांढरी केली गेली का? याचा तपासही यंत्रणांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.
>> अशोक खरातच्या कुठं आहेत मालमत्ता
पोलिसांनी अशोक खरातकडे केलेल्या चौकशीत तसेच इतर प्राप्त माहितीवरून त्याची मालमत्ता कोठे कोठे आहे याची माहिती जमा करण्यात आली.
> मिरगांव ता. सिन्नर जि. नाशिक येथे ३३ एकर जमीन स्वतःचे नांव
> मिरगांव ता. सिन्नर येथे फार्महाऊस
> पाथर्डी गांव, गौळाणे गांव ता. जि. नाशिक येथे १० एकर जमीन
> सिन्नर ता.सिन्नर जि. नाशिक येथे ६ एकर जमीन
> शिर्डी ता. राहाता जि. अहिल्यानगर येथे ४.५ एकर जमीन स्वतःचे नांवे
> काकडी ता. राहाता जि. अहिल्यानगर (शिर्डी विमानतळ) येथे ५.५ एकर जमीन.
> पाथर्डी फाटा नाशिक येथे ८०० स्क्वेअर फुट चा १ प्लॉट
> ओझर जि. नाशिक येथे ४ गुंठे चे ३ प्लॉट.
> आडगांव ता.जि. नाशिक येथे ५ गुंठे चा प्लॉट.
> पनवेल नवी मुंबई येथे ४० गुठे प्लॉट.
> कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफीस १८० स्क्वेअर फुट.
> संगमनेर जि. अहिल्यानगर येथे मुलगी श्रृष्टीचे नावावर ११ गुंठे प्लॉट.
> पुणे येथे मुलीच्या नांवावर प्लॉट.
> कर्मयोगी नगर, नाशिक येथे बंगला.
> शिर्डी, ता. राहाता नि. अहिल्यानगर येथे पार्टनरशीपमध्ये साई सिल्वर औक मंगल कार्यालय
> सिन्नर ता. सिन्नर जि. नाशिक येथे ५ जणांमध्ये मिळून ६ एकर जमीन,
> स्वतःकडे १२ तोळे सोने
> पत्नीकडे २० तोळे सोने
> पत्नीच्या नांवे डीमॅट अकाउंट १ ते २ लाख गुंतवणुक
> एकूण बँक खाते ५ असल्याचे समोर आले आहे. आयसीआयसीआय, युनियन बँक, सारस्वत, एसबीआय, विश्वास को-ऑप आदी बँकांमध्ये खाती असल्याची माहिती.
अशाप्रकारे अंदाजे एकूण ४० कोटी ८७ लाख रुपयांचे बाजारमूल्य असणारी संपत्तीचा छडा पोलिसांना लावता आला आहे.
