TRENDING:

Ashok Kharat : Ashok Kharat : खरात प्रकरणात मोठी अपडेट, उत्तेजक औषंधामुळे मृत्यूच्या दारात, पण वासना सुटेना! लकव्यानंतरही महिलांवर अत्याचार

Last Updated:

Ashok Kharat Case: वासनेने अंध झालेल्या खरातने केवळ महिलांची फसवणूकच केली नाही, तर शरीरसुखाचा हव्यास पूर्ण करण्यासाठी तो 'शक्तीवर्धक' औषधांचा अतिवापर करत होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू खरातचे एक-एक कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक खरात प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून सुरू असून त्यांनी तपासाला वेग दिला आहे. अशोक खरातच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे समोर येत असून दुसरीकडे पोलिसांकडून त्याच्याशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती सुरू आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
खरात प्रकरणात मोठी अपडेट, उत्तेजक औषंधाच्या अतिसेवनानं मृत्यूच्या दारात पोहचला, पण वासना सुटेना!अर्धांगवायूच्या झटक्यानंतरही महिलांवर अत्याचार
खरात प्रकरणात मोठी अपडेट, उत्तेजक औषंधाच्या अतिसेवनानं मृत्यूच्या दारात पोहचला, पण वासना सुटेना!अर्धांगवायूच्या झटक्यानंतरही महिलांवर अत्याचार
advertisement

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, वासनेने अंध झालेल्या खरातने केवळ महिलांची फसवणूकच केली नाही, तर शरीरसुखाचा हव्यास पूर्ण करण्यासाठी तो 'शक्तीवर्धक' औषधांचा अतिवापर करत होता. याच औषधांच्या विळख्यात अडकल्यामुळे एका वर्षापूर्वी त्याला अर्धांगवायूचा (Paralysis) झटका आला होता, तरीही त्याचे काळं कृत्य थांबलं नव्हतं, अशी धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.

नशेत शरीर अन् वासनेचा विळखा

advertisement

तपासातील सूत्रांनी 'दिव्य मराठी'ने दिलेल्या माहितीनुसार, खरातने ताकद वाढवण्यासाठी आणि लैंगिक क्षमता टिकवण्यासाठी उत्तेजक औषधांचा मोठ्या प्रमाणावर डोस घेतला होता. याचा परिणाम त्याच्या शरीरावर होऊन वर्षभरापूर्वी त्याला गंभीर अर्धांगवायूचा झटका आला. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. एका डॉक्टर भक्ताने त्याचे प्राण वाचवले खरे, पण या आजारपणामुळे त्याचा एक हात निकामी झाला असून डोळ्याची भुवईही कायमची वाकडी झाली आहे. मात्र, इतका मोठा शारीरिक आघात होऊनही खरातचा महिलांच्या शोषणाचा 'सिलसिला' सुरूच होता.

advertisement

सामान्यच नाहीतर अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील जाळ्यात

खरातच्या 'कॅनडा कॉर्नर' येथील कार्यालयात केवळ सामान्य महिलाच नाही, तर प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींनाही लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील काही पीडितांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

दरम्यान, खरातच्या या दुष्कृत्याच्या प्रकरणाची चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी (SIT) पथकाने गुरुवारी दुपारी खरातचे 'ओकस' कार्यालय सील केले. या कार्यालयातून अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि पुरावे हस्तगत केले जाण्याची शक्यता आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सलाम! ‘ते’ दृश्य पाहिलं अन् कार घ्यायचा प्लॅन रद्द केला, थेट ॲम्ब्युलन्स घेतली, नववी पास महिलेचं मोठं काम, Video
सर्व पहा

दरम्यान, अशोक खरातचा २५ वर्षांपूर्वीचा एक भयंकर कांड उघडकीस आला आहे. त्याने अघोरी कृत्य करत एका कुत्र्‍याचा बळी दिला होता. तसेच एका क्लास चालकाला त्याच्याच क्लासमधील एका विद्यार्थिनीसोबत दुसरा विवाह करायला भाग पाडलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. एका मराठी वृत्तपत्राने जुन्या जाणत्या गावातील लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त दिलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat : Ashok Kharat : खरात प्रकरणात मोठी अपडेट, उत्तेजक औषंधामुळे मृत्यूच्या दारात, पण वासना सुटेना! लकव्यानंतरही महिलांवर अत्याचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल