माझ्यावर हल्ला करणारा दळवी आणि त्याचे जे सहकारी आहेत, त्यांचे फोटो आता समोर आले आहेत. त्यांचे शरदचंद्र पवार आणि खासदार निलेश लंके यांच्यासोबत फोटो आहेत. या सर्व लोकांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला. माझी आणि या माणसांची काही वैयक्तिक दुश्मनी नाही. पण पवार कुटुंबाने असे गुंडे पोसलेले आहेत. आज त्याच गुंडानी माझ्यावर हल्ला केला, असं गंभीर आरोप हाके यांनी केला.
advertisement
"माझ्यावर आजपर्यंत ८ ते ९ हल्ले झाले आहेत. पण हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई होत नाही. हल्लेखोरांवर कारवाई झाली असती तर मला आज संरक्षण द्यायची देखील गरज पडली नसती. पोलिसांचा संरक्षण असताना काल माझ्यावर हल्ला झाला, या लोकांना वर्दीची भीती नसावी , यांना माहिती आहे की हल्ला केल्यावर काहीच होत नाही. त्यामुळे ते अनेकांवर हल्ला करतील", असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
अंतर्गत विवाहाबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हाके पुढे म्हणाले, "हे आता सांगत आहेत की अंतर्गत विवाह बद्दल बोललो म्हणून माझ्यावर हल्ला केला. या लोकांना कल्पना नाही की छत्रपती शाहू महाराजांनी शंभरपेक्षा अधिक आंतरजातीय विवाह लावून दिले होते. यांना शाहू महाराज कळायला यांच्या पुढच्या शंभर पिढ्या जातील. महाराष्ट्र ओरबडून खाण्याचे काम या मंडळींनी केलं आहे. पाहुण्या रावळ्यांचं राज्य या लोकांनी महाराष्ट्रावर आणलं. सहकारी संस्था यांच्या नावावर केल्या. महाराष्ट्रातला 50 ते 60 टक्के ओबीसी समाज आजही मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे. हा समाज आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.