TRENDING:

Aurangzeb Kabar NIA : औरंगजेब कबर प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री, कोण आलंय रडारवर?

Last Updated:

Aurangzeb Kabar NIA : औरंगजेब कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) एन्ट्री झाली आहे. एनआयएच्या तीन टीम मराठवाड्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू झाला आहे. कबरीच्या वादामुळे राज्यातील वातावरण तणावपूर्ण झाले असताना दुसरीकडे आता मोठी अपडेट समोर आली आहे. औरंगजेब कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) एन्ट्री झाली आहे. एनआयएच्या तीन टीम मराठवाड्यातील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.
News18
News18
advertisement

औरंगजेबाच्या कबरीविरोधात नागपूरमध्ये आंदोलन झाले. या आंदोलनात झालेल्या कथित चादर जाळण्यावरून वातावरण तणावपूर्ण झाले आणि त्याचे पर्यावसन दंगलीत झाले. या दंगलीतील आरोपींना अटक करण्यात येत आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. तर, दुसरीकडे राज्यात इतर ठिकाणी तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. औरंगजेब कबर वादावर केंद्राचे बारीक लक्ष आहे. ती एनआयएचे तीन पथक मराठवाड्यात दाखल झाले आहे.

advertisement

एनआयएचे कोणत्या मुद्यावर लक्ष?

औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या आडून कोणतीही दहशतवादी कारवाई होऊ नये यासाठी एनआयए दक्ष आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्लिपर सेल आणि सीरियाशी संपर्कात असलेल्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याशिवाय काही हिंदुत्ववादी संघटनांच्या काही नेत्यांवर एनआयएची पाळत ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे.

नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांची कारवाई...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

नागपूर दंगलीमधील आरोपींविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोपींविरोधात नागपूर दंगल प्रकरणात आरोपी फहिम खान आणि इतर आरोपींवर BNS 152 अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे ते 172 व्हिडीओ सायबर पोलीसांच्या हाती लागले आहेत. CCTV आणि व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली आहे. नागपूरमधील दंगल प्रकरणी मागील दोन दिवसात जवळपास 90 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Aurangzeb Kabar NIA : औरंगजेब कबर प्रकरणात आता एनआयएची एन्ट्री, कोण आलंय रडारवर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल