कोमकर -गायकवाड टोळीकडून वनराजची हत्या
खरं तर, गेल्या वर्षी वनराज आंदेकर यांना कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या टोळीने कोयत्याने वार करून आणि गोळ्या घालून मारलं होतं. या हत्येनंतर आंदेकर टोळीने गायकवाड आणि कोमकर टोळीतील साथीदारांना मारण्याचा कट रचला होता. यातून शुक्रवारी पाच सप्टेंबरला नाना पेठेत वनराजच्या हत्येतील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुषला गोळ्या घालून संपवलं. आयुषची हत्या झाली असली, तरी आंदेकर टोळीचा खरा पिक्चर वेगळाच होता, अशी माहिती आता समोर आली आहे.
advertisement
गायकवाड टोळीवर हल्ल्याचा प्लॅन?
आंदेकर टोळीचा साथीदार दत्ता काळे यांने आंबेगाव पठार परिसरात गायकवाड गटातील साथीदारांच्या घराची रेकी केली होती. आयुषची हत्या होण्याच्या चार दिवस आधी पोलिसांनी आंदेकर टोळीचा कट उधळून दत्ता काळेला अटक केली होती. पण गायकवाड टोळीच्या साथीदारावर हल्ला करण्यासाठी आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने मदत केल्याची माहिती आहे. हल्ल्यासाठी लागणाऱ्या शस्त्रांची व्यवस्था या टोळीमार्फत केली जात असल्याचीही माहिती आहे.
पठाण टोळीच्या दोघांना पकडलं
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या गुन्हे शाखा पथकाला माहिती मिळाली होती की, टिपू पठाण टोळीचे दोन सदस्य तालीम खान आणि युनूस हे सोमवार पेठ परिसरात शस्त्रांसह थांबले आहेत. पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे आणि पथकाने सापळा रचून दोघांना पकडलं. त्यावेळी दोघांकडे गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती.
तपासात समोर आले की, वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि इतर साथीदारांची घरं आंबेगाव पठार परिसरात आहेत. या घरांची रेकी करून, योग्य संधी पाहून गायकवाड गटावर हल्ला करण्याचा कट आखला गेला होता. यात दत्ता काळे, कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आणि टिपू पठाण टोळीतील काही सदस्यांचा सहभाग होता. काळे याने गायकवाड गटाच्या सदस्यांच्या घरांची माहिती गोळा केली. यासाठी कृष्णा आंदेकरने हल्ल्यासाठी अमन पठाणला बोलावण्याची तयारी केली. यासाठी खोली भाड्याने घेण्यासाठी पैसे दिले गेले, अमन पठाणनेच पुढे “लक्ष ठेवा, बाहेर आला की कळवा” अशी सूचना दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं.