TRENDING:

स्त्री बीज रॅकेट प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे पुरावे, ५०० महिलांचे फोटो, बनावट सरकारी दस्तावेज अन्....

Last Updated:

बदलापुरातील जोवेली परिसरात गरजू महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्री बीज वाढवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
बदलापूर (ठाणे): बदलापूरमध्ये महिलांना पैशाचं आमिष दाखवून बीजांची तस्करी केल्याची घटना समोर आल्यावर पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबूकस्वार आणि मंजुषा वानखेडे यांना अटक केली आहे. उद्या आरोपींची कोठडी संपत असून तीन आरोपींना उद्या अंबरनाथ कोर्टात हजर करण्यात येईल.
बदलापूर स्त्री बीज रॅकेट
बदलापूर स्त्री बीज रॅकेट
advertisement

बदलापूर पूर्वेतील जोवेली परिसरात गरजू महिलांना पैशांचे अमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्री बीज वाढवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या रॅकेटचे जाळे राज्याबाहेरपर्यंत पसरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

आरोपींच्या चौकशीतून सोनेग्राफीकरता मदत करणाऱ्या महिलेला काल अटक करण्यात आलीये. या महिलेला उद्या (बुधवारी) कोर्टात हजर केले जाईल. गरजू महिलांना १५ ते २० हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांचे बनावट सरकारी दस्तावेज तयार करुन डॉक्टर, IVF सेंटर, हॅास्पिटल आणि स्त्री बीज तस्कर अशी मोठी टोळी आहे. या टोळीचा बदलापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

advertisement

या आरोपींच्या तपासात ५०० पेक्षा अधिक महिलांचे फोटो बनावट सरकारी दस्तावेज आढळले असून या स्त्री बीज रॅकेटची पाळमुळे फक्त राज्यात आणि देशात नाही तर जगभरात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढलीये.

टोळी मोठ्या प्रमाणात नफा कमवायची

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलिसांची ट्रॅफिकक्युअर प्रणाली काय? Video
सर्व पहा

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी महिलांकडून बीजांड ७० ते ८० हजार रुपयांना विकले जात होते. तर बीजांड देणाऱ्या महिलांना साधारण ३० हजार रुपये दिले जात होते. या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर नफा कमावला जात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्त्री बीज रॅकेट प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठे पुरावे, ५०० महिलांचे फोटो, बनावट सरकारी दस्तावेज अन्....
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल