संगमनेरमधील घुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना कीर्तनकार भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली. भंडारे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या मांडणीवर आणि स्थानिक राजकारणाच्या भाष्यावर उपस्थित काहींनी आक्षेप नोंदवला होता. महाराजांनी अभंगावर बोलावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, संग्राम भंडारे, त्यांचे समर्थक आणि आक्षेप घेणाऱ्या ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली होती. त्यावरून राजकारण पेटलं आहे.
advertisement
सोमवारी रात्री हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असे म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना थेट मारण्याची धमकी दिल्याने राज्यात खळबळ उडाली होती. त्यावर आता बाळासाहेब थोरातांनी भाष्य केले.
धमकीवर बाळासाहेब थोरातांनी काय म्हटले?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेत जीवे मारण्याच्या धमकीवर भाष्य केले. 'मी काही महात्मा गांधी नाही अन् होऊ शकत नाही. परंतु असा कुणी नथुराम गोडसे समोर आल्यावर, विचार अन् तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारील', असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.
बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, घुलेवाडीतील कीर्तनात घडलं काय, त्यावर त्यांना कुणी थांबवलं नाही. परंतु त्यांनी मूळ अभंग सोडून, ज्यावेळेस दुसऱ्या विषयांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. स्थानिक राजकारणावर बोलायले लागले, राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वावर नकारात्मक बोलायला लागेल, तेव्हा एका युवकाने उभं राहून आक्षेप घेतला. महाराज तुम्ही अभंगावर बोला, एवढचं त्या युवकाने म्हटले होते, असे थोरात यांनी म्हटले.
बाळासाहेब थोरात यांनी भंडारे यांच्यावर टीका करताना म्हटले की, 'कीर्तनात काय काय वक्तव्य केले महाराजांनी, तर ते तथाकथित महाराज आहे. खऱ्या वारकारी संप्रदायाच्या परंपरेत काही राजकारण करण्यासाठी घुसले आहेत, त्यातला तो प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले. घुलेवाडीतील गोंधळाबाबत थोरात यांनी म्हटले की, कुणीही त्यांचं कीर्तन तिथं थांबवलं नाही, कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही, त्यांच्या गाडीची तोडफोड झालेली नाही, तिथं पत्रकार मंडळी होती. त्यांना सर्व माहित असल्याचे म्हटले.
खोट्या तक्रारी दाखल करण्याचे षडयंत्र...
घुलेवाडीतील गोंधळानंतर आता खोटे गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी म्हटले. इथले महाराज कुणाच्या तरी हातातील खेळणं बनलेले आहेत. संगमनेर तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्ये करत असल्याचे त्यांनी म्हटले.