याच मागणीसाठी जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन बंजारा समाजातील युवकांनी आमरण उपोषण सुरू केला आहे. त्याचबरोबर 15 सप्टेंबर रोजी जालना शहरात भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. बंजारा समाज हा 1947 पासून एसटी प्रवर्गामध्ये होता. परंतु संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यानंतर बंजारा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात आला. बंजारा समाज हा इतर राज्यामध्ये एसटी आरक्षणामध्येच आहे. आमची बोलीभाषा राहणीमान वेशभूषा एकच आहे. त्यामुळे बंजारा समाजाला इतर राज्यांप्रमाणे एसटी आरक्षणाचा लाभ द्यावा अशी मागणी आंदोलन यांनी केली आहे.
advertisement
तर इतर कोणत्याही समाज घटकाला एसटी आरक्षणात समाविष्ट करू नये या मागणीसाठी देखील प्रतिआंदोलन होत असल्याचे पाहायला मिळते. जालना शहरामध्ये शुक्रवारी आदिवासी समाज बांधवांकडून याच मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. एकंदरीत आरक्षणाच्या विषयाभोवती मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण फिरत असल्याचं पाहायला मिळतंय.