TRENDING:

कोल्हापुरात फुललं 'कास पठारा'सारखं सौंदर्य; 'या' सोनेरी-पिवळ्या फुलांनी पर्यटकांचं वेधलं लक्ष!

Last Updated:

Kolhapur News : साताऱ्यातील मनमोहक कास पठारावरील फुले पर्यटाकांची गर्दी खेचत आहे. पण कोल्हापूरतील आजरा तालुक्यातील उत्तूरमध्ये पडीक जमिनीवर उमलेल्या...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kolhapur News : साताऱ्यातील मनमोहक कास पठारावरील फुले पर्यटाकांची गर्दी खेचत आहे. पण कोल्हापूरतील आजरा तालुक्यातील उत्तूरमध्ये पडीक जमिनीवर उमलेल्या सोनकीच्या रानफुलांनीदेखील पर्यटकांना आकर्षिक केलेलं आहे. सोनकी फुलांचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

पेंढारवाडी, धामणे, माद्याळ आणि हुडे याठिकाणी पडीक जमिनीवर आणि पठारांवर पिवळी सोनकी फुले उमलली आहे. हे दृश्य इतके मनमोहक आहे की, साताऱ्यात कास पठारासारखा अनुभव पर्यटकांना येत आहे. या मनमोहक दृश्याचा आनंद लुटण्यासाठी आसपासच्या परिसरातून आलेल्या लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही सोनकी फुले सकाळी उमलतात आणि सायंकाळी मावळतात.

advertisement

सध्या वातावरणात ऊन अन् पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे या फुलांवर प्रकाश पडला की, सोन्यासारखी चमकताना दिसतात. या फुलांमुळे या परिसरात मधमाशांची प्रमाण वाढलेलं दिसतं आहे. त्यामुळे मधाचं प्रमाणही वाढतं. पावसाच्या वातावरणात कोल्हापूरातील अनेक ठिकाणी निसर्गाचे अनोखे दृश्य पाहायला मिळते. पर्यटकांकडून वर्षा सहलीचेही आयोजन केले जाते.

आजरा, आंबोली, गारगोटी, भुदरगड या परिसरातील निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. त्यांच्या या प्रवासांना सोनकीच्या फुलांना लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे हे पर्यटक पठारावर थांबून रानफुलांचं सौंदर्य अनुभवताहेत. या सोनकीच्या फुलांचं मनमोहक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत.

advertisement

हे ही वाचा : MHADA Lottery: छत्रपती संभाजीनगर आणि बीडसाठी खुशखबर, म्हाडा लॉटरी अर्जाची अंतिम तारीख वाढली, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

हे ही वाचा : कोल्हापूरच्या परंपरेला गालबोट लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; पोलीस अधिक्षकांचा थेट इशारा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापुरात फुललं 'कास पठारा'सारखं सौंदर्य; 'या' सोनेरी-पिवळ्या फुलांनी पर्यटकांचं वेधलं लक्ष!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल