कोल्हापूरच्या परंपरेला गालबोट लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; पोलीस अधिक्षकांचा थेट इशारा
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur News : गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रशासनाने ठरवून दिलेल्या आचारसंहितेचे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांसह विविध घटकांकडून पालन व्हावे, यासाठी...
Kolhapur News : कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा, नियमांचं उल्लंघन कराल तर थेट खटले दाखल केले जातील. कोल्हापूरच्या परंपरेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा सज्जड दम अपर पोलीस अधीक्षक डाॅ. धीरजकुमार बच्चू यांनी दिला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रशासनाने ठरवून दिलेल्या आचारसंहितेचे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांसह विविध घटकांकडून पालन व्हावे, यासाठी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक बोलत होते. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष सागर चव्हाण, गोटू चव्हाण, सरदार पाटील आदी उपस्थित होते.
आदेशांचे काटेकोर पालन करा
डॉ. धीरजकुमार म्हणाले, "कायदा आणि नियमांच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा, उत्सवात पोलिसही आनंदाने सहभागी होतील. पण नियमांच्या उल्लंघनाचा प्रयत्न करू नका. ध्वनिप्रदूषण आणि लेसर किरणांबाबत न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. आदेशांचे काटेकोर पालन करून गणेशोत्सव साजरा करा."
advertisement
...अन्यथा सिस्टीम जप्त केली जाईल
"ध्वनिप्रदूषणासह लेसर किरणांमुळे निष्पापांना झळ सोसावी लागते आहे. मिरवणुकीत प्रेशर मिड, स्मोक गॅसला मनाई करण्यात आली आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांसह साऊंड सिस्टीम जनरेटर, मंडप, लाईट असोसिएशन पदाधिकार्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांच्या उल्लंघनाचा प्रयत्न झाल्यास सिस्टीम यंत्रणा जागेवर जप्त केली जाईल, शिवाय थेट खटले दाखल करण्यात येतील", असा इशाराच त्यांनी दिला.
advertisement
हे ही वाचा : Pune News : वाहनचालकांना मिळणार मोठा दिलासा; 10 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार 'हे' यांत्रिक वाहनतळ
हे ही वाचा : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! साताऱ्यात 4 लाख शेतकऱ्यांचं Farmar ID कडे दुर्लक्ष, होणार मोठं आर्थिक नुकसान
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 11:19 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरच्या परंपरेला गालबोट लावू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; पोलीस अधिक्षकांचा थेट इशारा