शेतकऱ्यांनो लक्ष द्या! साताऱ्यात 4 लाख शेतकऱ्यांचं Farmar ID कडे दुर्लक्ष, होणार मोठं आर्थिक नुकसान
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Satara News : शेतकऱ्यांचे फार्मर आयडी दुर्लक्ष होत असल्यामुळे सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडी...
Satara News : शेतकऱ्यांचे फार्मर आयडी दुर्लक्ष होत असल्यामुळे सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे. अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढता आलेली नाही. सातारा जिल्ह्यातील 5 लाख 24 हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेल्या आहेत, तर साडेचार लाख शेतकऱ्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही.
'या' कारणांमुळे नोंदणी करता येत नाही
मोठ्या प्रमाणात शेती असणारे आणि गुंठेवारीत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीकडे दुर्लक्ष केलेले आहे. कारण फार्मर आयडीचे महत्त्व आणि फायदे याबद्दल अजूनही शेतकऱ्यांमध्ये जागृती नाही. ज्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता आलेला आहे.
मोबाईल ॲप आणि वेब पोर्टलवरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. पण शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसल्यामुळे नोंदणी करणं अडचणीचं जात आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी 5 लाख 24 हजार 580 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे. उरलेल्या 4 लाख 40 हजार 16 शेतकऱ्यांनी ॲग्रीस्ट्रकवर नोंदणी करून आयडी काढणे बाकी आहे.
advertisement
...तर शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार
फार्मर आयडी नसल्यामुळे शासनाच्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना घेत येणार नाही. याबाबत शेतकऱ्यांमध्ये पुरेशी जागृती करणं गरजेचं आहे. त्यासाठी तालुका आणि गावपातळीवर मोहीम राबवण्याची आवश्यता आहे. कारण फार्मर आयडी नसल्यामुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येणार नाही, त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 8:54 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! साताऱ्यात 4 लाख शेतकऱ्यांचं Farmar ID कडे दुर्लक्ष, होणार मोठं आर्थिक नुकसान


