शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! ई पीक पाहणीसंदर्भात कृषी विभागाचा मोठा निर्णय
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : सध्या कापूस आणि सोयाबीनचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांना हमीभावानेच विक्री करणे फायदेशीर ठरणार आहे. पण सातबारा उताऱ्यावर नोंद नसेल तर हमीभावाने ही पिके विकता येणार नाहीत.
मुंबई : सध्या कापूस आणि सोयाबीनचे भाव दबावात आहेत. शेतकऱ्यांना हमीभावानेच विक्री करणे फायदेशीर ठरणार आहे. पण सातबारा उताऱ्यावर नोंद नसेल तर हमीभावाने ही पिके विकता येणार नाहीत.
त्यासाठी ई-पीक पाहणी करावी लागेल. प्रशासनाने ई-पीक पाहणीसंदर्भातल्या तांत्रिक अडचणी सोडवल्या असून प्रक्रिया सुलभ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी पूर्ण करून हमीभावाने विक्रीसाठी तयारी ठेवावी, असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे.
देशातील बाजारात सध्या सर्वच शेतीमालाचे भाव दबावात आहेत. कापूस आणि सोयाबीन गेल्या वर्षीपासून हमीभावाच्या खाली आहेत. त्यातच केंद्र सरकारने कापूस आयातीवरील 11 टक्के शुल्क काढले. 31 डिसेंबर 2025 पर्यंत कापूस आयातीवर शुल्क नसेल. त्यामुळे देशात विक्रमी आयात होऊन दर दबावातच राहणार आहेत.
advertisement
सरकारने यंदा मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल 7 हजार 710 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी 8 हजार 110 रुपये हमीभाव जाहीर केला. खुल्या बाजारात यंदा कापसाला हमीभावाएढे दर मिळणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त हमीभावाने होणाऱ्या सरकारी खरेदीवर असेल.
सोयाबीनचे भावही सध्या दबावातच आहेत. सोयाबीनचा हमीभाव 5 हजार 328 रुपये आहे. परंतु बाजारात सध्या सोयाबीन 4 हजार 300 ते 4 हजार 600 रुपयाने सोयाबीन विकले जात आहे. बाजारात सोयाबीन आवक वाढल्यानंतर दरावर आणखी दबाव येणार आहे. तुरीचे भाव सध्या दबावात आहेत. त्यामुळे हमीभावाने कापूस, सोयाबीन आणि तूर विकण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी ठेवावा, असे अभ्यासकांनी सांगितले.
advertisement
ई-पीक पाहणी का करायची?
पीकविम्याची भरपाई मिळते.
अतिवृष्टीची मदत मिळते.
हमीभावाने कापूस, सोयाबीन, तूर विक्री करता येते.
शासकीय योजनांचा लाभ मिळतो.
लागवड केलेल्याच पिकांची नोंद होते.
पिकांच्या लागवड, उत्पादनाचा अचूक अंदाज मिळतो.
शेतकऱ्यांनी कळविलेल्या अडचणी सोडवल्या आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणीची गती मागील आठवड्यात वाढली. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी केली नाही त्यांनी मुदतीत करून घ्यावी. काही अडचणी असल्यास प्रशासनाला कळवाव्यात. असे आवाहन सरिता नरके (राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी प्रकल्प) यांनी केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 8:03 AM IST


