MHADA Lottery: छत्रपती संभाजीनगर आणि बीडसाठी खुशखबर, म्हाडा लॉटरी अर्जाची अंतिम तारीख वाढली, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

Last Updated:

मंडळाने छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनांमधील घरांसाठीच्या लॉटरीच्या अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे ज्यांनी अजून अर्ज केला नाही त्यांना अर्ज करण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि बीडसाठी खुशखबर ; म्हाडा लॉटरी अर्जाची अंतिम तारीख वाढली जा
छत्रपती संभाजीनगर आणि बीडसाठी खुशखबर ; म्हाडा लॉटरी अर्जाची अंतिम तारीख वाढली जा
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) छत्रपती संभाजीनगर मंडळाने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. मंडळाने छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनांमधील घरांसाठीच्या लॉटरीच्या अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2025 होती, ती आता वाढवून 8 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अजून अर्ज केला नाही त्यांना अर्ज करण्यासाठी आणखी वेळ मिळाला आहे.
लॉटरीमध्ये काय आहे?
या लॉटरीमध्ये एकूण 1323 निवासी सदनिका आणि 18 भूखंडांचा समावेश आहे. यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांचा समावेश आहे. घर घेण्याची इच्छा असलेल्या अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी दत्तात्रय नवले यांनी केले आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आता 8 सप्टेंबर 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. या वेळेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्जासोबतच अनामत रकमेचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मात्र, आरटीजीएस अथवा एनईएफटी द्वारे अनामत रकमेचे पेमेंट अर्जदार 9 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळ संपेपर्यंत करू शकतील.
advertisement
सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या सादर केलेल्या अर्जदारांनाच पात्र मानले जाणार आहे. दरम्यान, सोडतीसाठी पात्र अर्जदारांची प्राथमिक यादी 15 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर (https://housing.mhada.gov.in) जाहीर केली जाणार आहे.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
MHADA Lottery: छत्रपती संभाजीनगर आणि बीडसाठी खुशखबर, म्हाडा लॉटरी अर्जाची अंतिम तारीख वाढली, कधीपर्यंत करता येणार अर्ज?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement