Pune Metro: बाप्पामुळे पुणे मेट्रोची चांदी! एकाच दिवसात 3,68,000 भाविकांनी केला प्रवास

Last Updated:

Pune Metro: पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणारे प्रवासी मंडई मेट्रो स्टेशनला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत.

Pune Metro: बाप्पामुळे पुणे मेट्रोची चांदी! एकाच दिवसात 3,68,000 भाविकांनी केला प्रवास
Pune Metro: बाप्पामुळे पुणे मेट्रोची चांदी! एकाच दिवसात 3,68,000 भाविकांनी केला प्रवास
पुणे: पुण्यात सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि प्रसिद्ध मंडळांनी साकारलेले देखावे बघण्यासाठी भाविक गर्दी करत आहे. गणपती दर्शनासाठी भाविक मेट्रोला प्राधान्य देत असल्याचं दिसत आहे. शनिवारी (30 ऑगस्ट) एकाच दिवसात 3 लाख 68 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. भाविकांचा प्रतिसाद बघता 30 ऑगस्टपासून मेट्रोने पहाटे दोनपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवली आहे. सोमवारपासून मेट्रो प्रवाशांची गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असून मेट्रोला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यंदा डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट मार्गावरील मेट्रो सेवा सुरू झालेली आहे. त्यामुळे गणपती पाहण्यासाठी येणारे भाविक मेट्रोचा वापर करत आहेत. पुणे मेट्रोच्या इतिहासात एका दिवसांत सर्वाधिक प्रवाशांचा नवा उच्चांक शनिवारी प्रस्थापित झाला. सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू आहे. गेल्या वर्षी गणपती विसर्जनादिवशी उच्चांकी 3 लाख 46 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यावर्षी शनिवारी 3 लाख 68 हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी सलग 41 तास मेट्रो सुरू राहणार आहे.
advertisement
'मंडई'त सर्वाधिक गर्दी
पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणारे प्रवासी मंडई मेट्रो स्टेशनला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या स्टेशनवरून शनिवारी 56 हजार 131 प्रवाशांनी प्रवास केला. कसबा, मंडई ही मेट्रो स्टेशन शहराच्या मध्यवर्ती भागातील गणपती पाहण्यासाठी जवळ पडतात. त्यामुळे या दोन स्टेशन्सवरती आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मेट्रो प्रशासनाकडून सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी नियोजन केलं जात आहे.
advertisement
महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क) चंद्रशेखर तांभवेकर म्हणाले, "गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी भाविकांसाठी मेट्रो सोयीची ठरत आहे. मंडई मेट्रो स्टेशनवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रोकडून तयारी केली गेली आहे. नागरिकांनी कसबा स्टेशनवर उतरून मध्यवर्ती भागात देखावे पाहण्यासाठी जावे. देखावे पाहिल्यानंतर मंडई स्थानकावरून परतीचा प्रवास करता येईल."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Metro: बाप्पामुळे पुणे मेट्रोची चांदी! एकाच दिवसात 3,68,000 भाविकांनी केला प्रवास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement