Pune News : ऐन गणपतीत पुणेकरांना गुड न्यूज! वाहतूक कोंडी सुटणार, सिंहगड उड्डाणपुलाच आज लोकापर्ण
Last Updated:
Sinhagad Road Flyover : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 1 सप्टेंबर रोजी सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे उद्घाटन करणार आहेत. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि नागरिकांना प्रवासात सोयीसुविधा मिळणार आहे.
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन अखेर निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उड्डाणपुल सोमवारी 1 सप्टेंबर अर्थात आज दुपारी 3 वाजता लोकार्पित केला जाणार आहे. उद्घाटनानंतर उड्डाणपूल तातडीने वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.
उद्धाटन समारंभात केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांसह शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या उड्डाणपुलाचा उद्देश सिंहगड रस्त्यावरील नेहमीच्या वाहतुकीच्या कोंडीला कमी करणे हा आहे.
सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या मार्गावर उड्डाणपुल उभारण्यात आला आहे. यापूर्वी या मार्गावरील काही उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आले आहेत. यामध्ये राजाराम पूल चौक ते फनटाइम चित्रपटगृह दरम्यान 520 मीटर लांबीचा उड्डाणपुल आणि विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम चित्रपटगृह दरम्यान 2,120 मीटर लांबीचा उड्डाणपुल यापूर्वीच वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.
advertisement
तिसऱ्या टप्प्यातील गोयल गंगा चौक ते इनामदार चौक या 1,540 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाची वाहतूक खुला नव्हती. महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मते, उड्डाणपुलावर काही किरकोळ कामे बाकी होती. परंतू, कामे पूर्ण होऊनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येत नाही, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आणि त्यानंतर आंदोलन झाले.
यामुळे उड्डाणपुलावरील उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करण्यात आली. महापालिकेने उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला असून, उद्घाटनानंतर नागरिकांसाठी हा मार्ग तत्काळ उपलब्ध होणार आहे. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
advertisement
सिंहगड रस्त्यावर वाहतुकीचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी हे उड्डाणपूल शहराच्या वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नागरिकांना आणि वाहनचालकांना सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार असून, सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची समस्या लवकरच कमी होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 7:33 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : ऐन गणपतीत पुणेकरांना गुड न्यूज! वाहतूक कोंडी सुटणार, सिंहगड उड्डाणपुलाच आज लोकापर्ण


