अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या एकूण ६२० रिक्त पदांची भरती होणार आहे. शिरूर कासार आणि पाटोदा येथील प्रकल्पात फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया सुरू केली होती. हे दोन प्रकल्प वगळता उर्वरित सर्व प्रकल्पांमध्ये या पदांसाठी २४ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज संबंधित बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असं आवाहन महिला व बाल विकास विभागाकडून केली आहे.
advertisement
ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार असल्याची माहिती महिला व बालविकासचे मुख्य कार्यकारी कालिदास बडे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीआधी या भरतीप्रक्रियेवर स्थगिती दिली होती. मात्र आता निवडणुकीनंतर शासन निर्देशानुसार ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मदतनिसांची अंगणवाडी सेविका पदांवर पदोन्नती करून थेट रिक्त पदे भरली जाणार आहेत.