सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आल्याने राज्य निवडणूक आयोगाने हालचालींना गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांवरील आरक्षणाची सोडत आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आली. न बीड जिल्ह्यातील आरक्षणही या सोडतीत निश्चित करण्यात आले.मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात, मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण निश्चित झाले असून, यामुळे आगामी निवडणुकीत महिला नेतृत्वाला मोठा संधी मिळणार आहे.
advertisement
सहा नगरपालिकांपैकी चार नगरपालिका या महिलांसाठी
बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिकांपैकी चार नगरपालिका या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. तर दोन नगरपालिका या अंबाजोगाई आणि धारुरसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. बीड- अनुसूचित जाती महिला, माजलगाव - ओबीसी महिला, अंबाजोगाई - ओबीसी , धारूर- सर्वसाधारण , परळी - सर्वसाधारण महिला , गेवराई- सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील नगरपालिकांचे आरक्षण चित्र
बीड- अनुसूचित जाती महिला
माजलगाव - ओबीसी महिला
अंबाजोगाई - ओबीसी
धारूर- सर्वसाधारण
परळी - सर्वसाधारण महिला
गेवराई- सर्वसाधारण महिला.
147 नगरपंचायत अध्यक्षांचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. एकूण महिलांसाठी 74 जागा राखी त्यातील सर्वसाधारण महिलांसाठी 38 जागा अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 7, मागासवर्ग प्रवरगास 20 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.