मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरात जालना रोड परिसरातील काझीनगर भागात ही घटना घडली. बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार अशोक काळे विजयाचा आनंद उत्सव साजरा करत असतानाच त्यांच्या ३२ वर्षाच्या मुलांने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. पवन अशोक काळे असं (वय 32) गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे.
advertisement
पवन काळे यांनी बीड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, पवन काळे यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचचलं, आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
वडिलांच्या विजयाचा उधळला होता गुलाल
दरम्यान, बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमध्ये पवन यांचे वडील अशोक काळे हे 21 डिसेंबरला लागलेल्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल विजयी झाले होते. प्रचारादरम्यान पवन हा वडिलांच्या विजयासाठी निवडणूक प्रचारात सक्रिय होता. निकालानंतर अशोक काळे विजयी झाल्यानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला होता. यावेळी विजयी मिरवणुकीत पवन सुद्धा सामील होता. नगर परिषदेत विजयामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं, पण अचानक पवन येणे टोकाचे पाऊल का उचललं. पवनने इतक्या टोकाचं पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
