महिलांवरील अत्याचारांच्या आणि मंगळसूत्र चोऱ्यांच्या बातम्या वारंवार ऐकून या विद्यार्थ्यांना यावर काहीतरी उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली. विशेषतः घरात आणि परिसरात या घटनांबद्दल होणाऱ्या चर्चेमुळे त्यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षिका विद्या कुबेर आणि रिता दुबे यांचे मार्गदर्शन घेतले आणि त्यातून हे उपकरण तयार केले.
advertisement
केवळ 300 ते 350 रुपयांच्या खर्चात तयार झालेले हे डिव्हाइस आता पेटंट घेण्यासाठी सादर करण्याची तयारी सुरू आहे. हे डिव्हाइस तयार करताना प्लास्टिक बॉक्स, व्होल्टेज जनरेटर, 3 व्होल्टची बॅटरी आणि एक स्विच बटण यांचा वापर करण्यात आला आहे. हे उपकरण महिलांना सॅंडल, चप्पल, शूज किंवा पर्समध्ये सहज बसवता येते. एका छोट्या वायरच्या साहाय्याने ते शरीराच्या कोणत्याही भागाशी जोडता येते. कोणी अचानक स्पर्श केला किंवा दागिना हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला हलका विद्युत झटका बसतो. त्यामुळे महिलेला कोणतीही इजा होत नाही, मात्र समोरची व्यक्ती त्वरित सावध होते.
“आम्ही दोघांनी मिळून हे डिव्हाइस तयार केलंय. याची साईज भविष्यात आणखी कमी होईल. ज्यामुळे महिलांना सहज हाताळता येईल. अगदी सँडलच्या टाचेत देखील ते बसवता येईल. त्यामुळे चोरी आणि इतर गैरप्रकार टाळता येतील,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले.





