advertisement

नववीच्या विद्यार्थ्यांची कमाल, महिला सुरक्षेसाठी बनवलं खास डिव्हाइस, ‘टच’ केलं तरी घडणार अद्दल, Video

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: कुणी महिलांचा दागिना हिसकावण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याला या उपकरणामुळे विजेचा हलका धक्का बसेल.

+
नववीच्या

नववीच्या विद्यार्थ्यांची कमाल, महिलांसाठी 350 रुपयांत बनवलं सुरक्षा कवच, कसं करतं काम? Video

छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या काळात मंगळसूत्र चोऱ्या, दागिने हिसकावण्याच्या घटना आणि महिलांवरील छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी अभिनव उपाय शोधला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जागृती हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणारे श्रीराज गोटे आणि रिझवान शेख यांनी ‘वुमन सेफ्टी डिव्हाइस’ तयार केले आहे. या उपकरणाच्या मदतीने कुणी दागिना हिसकावण्याचा किंवा महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याला हलका विजेचा धक्का बसेल. हे डिव्हाइस नेमकं काय आणि कसं काम करतं? याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
‎महिलांवरील अत्याचारांच्या आणि मंगळसूत्र चोऱ्यांच्या बातम्या वारंवार ऐकून या विद्यार्थ्यांना यावर काहीतरी उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली. विशेषतः घरात आणि परिसरात या घटनांबद्दल होणाऱ्या चर्चेमुळे त्यांनी या समस्येवर उपाय शोधण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षिका विद्या कुबेर आणि रिता दुबे यांचे मार्गदर्शन घेतले आणि त्यातून हे उपकरण तयार केले.
advertisement
‎केवळ 300 ते 350 रुपयांच्या खर्चात तयार झालेले हे डिव्हाइस आता पेटंट घेण्यासाठी सादर करण्याची तयारी सुरू आहे. हे डिव्हाइस तयार करताना प्लास्टिक बॉक्स, व्होल्टेज जनरेटर, 3 व्होल्टची बॅटरी आणि एक स्विच बटण यांचा वापर करण्यात आला आहे. हे उपकरण महिलांना सॅंडल, चप्पल, शूज किंवा पर्समध्ये सहज बसवता येते. एका छोट्या वायरच्या साहाय्याने ते शरीराच्या कोणत्याही भागाशी जोडता येते. कोणी अचानक स्पर्श केला किंवा दागिना हिसकावण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला हलका विद्युत झटका बसतो. त्यामुळे महिलेला कोणतीही इजा होत नाही, मात्र समोरची व्यक्ती त्वरित सावध होते.
advertisement
“आम्ही दोघांनी मिळून हे डिव्हाइस तयार केलंय. याची साईज भविष्यात आणखी कमी होईल. ज्यामुळे महिलांना सहज हाताळता येईल. अगदी सँडलच्या टाचेत देखील ते बसवता येईल. त्यामुळे चोरी आणि इतर गैरप्रकार टाळता येतील,” असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
नववीच्या विद्यार्थ्यांची कमाल, महिला सुरक्षेसाठी बनवलं खास डिव्हाइस, ‘टच’ केलं तरी घडणार अद्दल, Video
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement