खरं तर वारकरी संप्रदायामध्ये आदिनाथ महाराज यांचा मोठा अधिकार आहे. बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या तारकेश्वर गड या ठिकाणी ते महंत म्हणून काम पाहतात. बीडच्या आष्टी तालुक्यातील महिंदा गावात तारकेश्वर गड अध्यात्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.
दरम्यान आज आदिनाथ महाराज यांनी आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास गडावरच सर्व भक्तांना खोलीच्या बाहेर ठेवलं आणि ते एकटे खोलीत गेले.त्यानंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःच वार केला होता. या घटनेनंतर गंभीर जखमी आदिनाथ महाराजांवर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सध्या त्यांच्यावर उपचार सूरू आहे.
advertisement
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांची प्रकृती स्थिर
आदिनाथ महाराज यांनी असे पाऊल का उचलले याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही आहे. पण या घटनेने तारकेश्वर गडाच्या भाविक भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे.
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना मानणारा मोठा भक्त परीवार अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात आहे. आदिनाथ महाराज यांनी हे पाऊल उचलल्यान त्यांच्या पाथर्डी आणि बीड जिल्ह्यातील भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली आहे.
