नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटात मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या सदस्याचा समावेश करण्यात आलाय यामुळे याची चर्चा होऊ लागली आहे.
परळी नगरपरिषद निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट -16 , शिवसेना शिंदे गट - 2,एमआय एम - 1,अपक्ष - 4 अशा 24 जणांचा समावेश आहे. या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचा समावेश असून उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आणि शिंदे सेना यांच्या नगरसेवकांचा समावेश आहे
advertisement
भाजपचा गट स्वतंत्र एककीडे अजित पवार गट आणि शिंदे सेना यांनी एमआयएमला सोबत घेऊन गट स्थापन केला असताना, भारतीय जनता पक्षाने (BJP) मात्र यापासून अंतर राखत आपला स्वतंत्र गट कायम ठेवला आहे. महायुतीतील दोन महत्त्वाचे घटक पक्ष (अजित पवार गट आणि शिंदे सेना) एमआयएमसोबत गेल्याने भाजपच्या स्थानिक गोटात अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.
>> परळी नगरपालिका नगरसेवकांचे पक्षीय बलाबल
एकूण - 35
अजित पवार राष्ट्रवादी - 16
शरद पवार राष्ट्रवादी - 2
भाजप - 7
शिंदे शिवसेना - 2
एम आय एम - 1
काँग्रेस - 1
अपक्ष - 6
