माझ्यासमोर वाल्मिकचा फोन आला - अंबादास दानवे
वाल्मिक कराडसह बीडमधील काही कुख्यात गुंड बीडच्या तुरुंगात आहेत. मात्र, या तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच आता अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलं. आताही वाल्मिक कराड जेलमधून सर्व काही करीत आहे. माझ्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीला जेलमधून वाल्मिक कराडचा फोन आला होता, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
advertisement
चौकशी झालीच पाहिजे, दानवेंची मागणी
गेल्या तीन महिन्यांपासून आरोप केले जात आहेत, त्यामुले चौकशी झालीच पाहिजे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी, जिल्हा कारागृहातील सुरक्षा यंत्रणेला चकवा देत एका कैद्याने चक्क मोबाईल फोन अंतर्वस्त्रात लपवून ठेवला होता, अशी माहिती समोर आली होती. आरोपींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कारागृहातील पोलिस गोविंद भालेराव आणि रामअप्पा परळकर यांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात मोबाईल लपवलेला असल्याचे उघडकीस आलं होतं.
अंगझडतीत गांजाचे पुडे सापडले
दरम्यान, त्याआधी कारागृहातील दुसऱ्या एका कैद्याच्या अंगझडतीत गांजाचे पुडे सापडले होते. या सलग घडणाऱ्या सुरक्षाभंगाच्या घटनांनी जिल्हा कारागृहातील यंत्रणा गोंधळात सापडली आहे. कैद्यांकडून मोबाईल आणि अंमली पदार्थ आत आणले जात असतील, तर त्यामागे कोणाचा हात आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.