बीड : नर्सरीच्या (रोपवाटिका) माध्यमातून उत्पादित होणारी झाडे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात आणि वनस्पती संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करतात. झाडांच्या वाढीमध्ये यामुळे महत्वाची मदत होते. त्यामुळे जनावरांचा चारा, इंधन, लहान लाकूड, अन्न उत्पादने आणि औषधे यांच्या पुरवठ्यामध्ये उपजीविकेचा आधार वाढतो.
हरित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वृक्ष नर्सरी स्थापन करणे आणि आवश्यक कौशल्यांसह मानवी संसाधने मजबूत करणे महत्त्वाचे आहे. यामुळे बीड येथील अल्ताफ मिर्झा यांनी नर्सरी उद्योग सुरू केला आहे. या अल्ताफ मिर्झा यांनी नर्सरीची सुरुवात 5 वर्षांपूर्वी केली होती. दीड एकरमध्ये ही नर्सरी आहे. त्यांच्याकडे फळ आणि फुले मिळून ते 20 प्रकारच्या झाडांची विक्री करतात. एक झाड साधारण 150 रुपयांपसून विक्री करतात.
advertisement
5 वर्षांपूर्वी अल्ताफ मिर्झा यांनी या नर्सरीची सुरुवात केली होती. अगदी छोट्याशा जागेमध्ये सुरू केलेला हा व्यवसाय आज दीड एकरामध्ये वाढलेला आहे. या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीची झाडे आपल्याला पाहायला मिळतात.
Rain in Maharashtra : राज्यात पावसाचा कहर सुरूच, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट, VIDEO
फुलांची फळांची तसेच इतर मिळून 20 प्रकारच्या झाडांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारची रोपे देखील आपल्याला स्वस्त दरात मिळतात. या नर्सरीचे मालक अल्ताफ मिर्झा हे महिन्याला या व्यवसायातून अडीच ते तीन लाखांपर्यंत नफा मिळवतात.
समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंचीवर, पावसाळी पर्यटनासाठी निसर्गरम्य ठिकाण, Photos
फुलांची फळांची तसेच इतर मिळून वीस प्रकारच्या झाडांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतील. यामध्ये चिकू, सागुनी वृक्ष, बदाम, आंबा, जांभूळ, अशोक वाटिका, लिंबू, पेरू, सिताफळ, नारळ, हापुस आंबा, कढीपत्ता, कडुलिंब, करंजीची रोपे त्याचबरोबर फुलांमध्ये गुलाबाचे फुल, झेंडूचे फूल, कनेरी, मोगरा, सदाफुली अशी 20 प्रकारची रोपे आपल्याला पाहायला मिळतील.