मी बाबा बाबा केलं तर पोटात का दुखतं? : पंकजा मुंडे
आम्ही कधीही कुठेही जाऊन योगदान द्यायला तयार आहोत. त्या मंत्री झाल्या त्याचा मला आनंद झाला. त्यांच्या लढाईला यश आलं, त्यामुळे मला आनंद झाला. भारतीताई आमची बहीण आहे, तिला मोठ्या मतांनी निवडून द्या. जीन्स पॅन्टवाला पण शेतकरी असावा, टोपीवाले पण शेतकरी आहेत, टोपी नसलेले पण शेतकरी आहे. गोपीनाथ मुंडे म्हणून माझी ओळख, माझ्या बाबांचे नाव सगळे घेतात मी तर पोटी आलीय. बाबा बाबा केलं तर काय पोटात दुखतं? बाबांपेक्षा मला 10 पट संघर्ष करावा लागला. दहा वर्षे संघर्षानंतर मी उभी असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितले.
advertisement
यापूर्वी जातीपातीवर राजकारण..
नाशिकला यायचं जीवावर यायचं, समृद्धी महामार्गाने दीड तासात शिर्डीला येतो. कधी विकासाची ओळख करून दिली नाही. जाती धर्माची ओळख करून राजकारण करण्यात आलं. मी जेव्हा प्रचाराला जायचे तेव्हा नाकाला रुमाल लावावा लागायचा. शौचालय नव्हते, लोक उघड्यावर बसायचे. 2014 पर्यंत का वाटलं नाही, त्यातून वाचवलं पाहिजे. आता मला कुणी रस्त्यावर शौचालयाला बसलेले दिसत नाही. शौचालय बांधा हे सांगण्यामागे हा हेतू होता. महाशक्ती बनण्यासाठी भारती पवारांना निवडून द्या, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी दिंडोरी मतदारसंघातील जनतेला केलं.
वाचा - बीडमध्ये बोगस मतदान झाल्याचा रोहित पवारांचा आरोप; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय : पंकजा
5 वर्षे संविधानिक पदावर नव्हते तरी तुम्ही माझ्या पाठीमागे राहिलात. ही आपली ताकद आहे, कॉलर टाईट होते. माझ्याकडे कॉलर नाही पण गमछा उडवते. बाबांच्या मृत्यूनंतर माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आली, भरल्या ताटावरून माझा बाप गेला. तुम्हाला सोन्याचा घास भरवायचा होता, तीच तळमळ आहे. मुंडेसाहेब शाळेत जात होते, तेव्हा पायात चप्पल नव्हती, वंचित लोकांना साथ द्यायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. मोदींची चहाची टपरी, शेती बिती काही नाही, चहा विकून नोकरी करणारा माणूस पंतप्रधान झाला. पदावर राहिल्यावर तुमचे काम करता येते. मी देशाचा मंत्री झाल्यावर माझ्या लोकांचा वनवास संपावणार असं ते म्हणाले होते. एक मुलगा डाळिंब घेऊन आला, तो म्हटला पाणी आले म्हणून हे पीक आले देवाला वाहिले आणि दुसरे तुम्हाला आणले ही माझी पोचपावती आहे. तुमच्या भागातील ड्रायपोर्टबाबत मी स्वतः लक्ष देईल, असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी यावेळी दिलं.
