Beed Lok Sabha : बीडमध्ये बोगस मतदान झाल्याचा रोहित पवारांचा आरोप; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Beed Lok Sabha : बीडच्या परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवारांचा आरोप
रोहित पवारांचा आरोप
बीड, (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : राज्यात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या बीड लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी आज 2 व्हिडिओ ट्विट करत या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोग या प्रकरणी चौकशी करणार की केवळ विरोधकांवरच आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानणार? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
advertisement
रोहित पवार यांचे गंभीर आरोप
बीड लोकसभा मतदारसंघा भाजपकडून विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान व मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिंमत बबन गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली. निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
advertisement
पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
आमदार रोहित पवार यांच्या आरोपानंतर भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा म्हणाल्या, त्यांच्यावर मी काही उत्तर देणं प्रशस्त वाटत नाही. ज्याची कोणाची तक्रार आहे, त्यांनी निवडणूक आयोगाकडे करावी. असं घडलं असतं तर मी इथे उभी नसते. सलग पाचवी निवडणूक आम्ही हाताळतो आहोत. आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांनी 15 आमदार लावले होते. त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं हे लक्षण आहे. आमच्या भाषेत याला चिडी जाण्याचं लक्षण म्हणतात. निवडणूक झाल्यावर त्यांच्या अशा बोलण्यावरुन त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed Lok Sabha : बीडमध्ये बोगस मतदान झाल्याचा रोहित पवारांचा आरोप; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement