TRENDING:

‘ही’ कीड नष्ट करते नारळाची संपूर्ण बाग, शेतकऱ्यांनो, तातडीनं घ्या काळजी

Last Updated:

नारळाच्या झाडावर येणाऱ्या कीडीमुळे बागा नष्ट होत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड, 15 सप्टेंबर : नारळाच्या प्रत्येक भागाचा काही तरी उपयोग आहे. त्यामुळेच नाराळाला कल्पवृक्ष म्हंटलं जातं. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर नारळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर आता इतर भागातही नारळाची लागवड वाढलीय. कमी कष्टात आणि कमी खर्चात वर्षानुवर्ष पिकं कमावण्यासाठी शेतकरी नारळाच्या लागवडीला प्राधान्य देत आहेत. नाराळाच्या झाडावर हमखास एक कीड येते. त्याचा फटका संपूर्ण नारळाच्या बागेला बसून त्या बागा नष्ट होत आहेत.
advertisement

काय आहे संकट?

नारळाच्या झाडांवर गेंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव वाढलाय. भारतामध्ये नाराळाच्या झाडाला हा नेहमीच धोका असतो, अशी माहिती कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी दिलीय. झाडाला बुरशी लागणे, फळं गळणे या प्रकारची लक्षणं यामध्ये सुरुवातीला दिसतात. तुमच्या नारळाच्या झाडाला हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याचा उपाय देखील चांडक यांनी सांगितला आहे.

advertisement

वीज बिलाच्या टेन्शनमधून होईल शेतकऱ्याची सुटका! 'या' सरकारी योजनेला जबरदस्त प्रतिसाद

गेंडा भुंगा हा मध्यम आकाराचा असून, रंगाने गडद तपकिरी किंवा काळा असतो. त्याच्या डोक्‍यावर पाठीमागच्या बाजूस गेंड्यासारखे एक शिंग असल्यानेच या किडीला 'गेंड्या भुंगा' असे म्हटले जाते. प्रौढ भुंगा नारळाच्या झाडाचे नुकसान करतो. गेंड्या भुंग्याच्या अंडी, अळी आणि कोष या तीनही अवस्था शेणखत तसेच कुजलेल्या पालापाचोळ्यामध्ये आढळतात.

advertisement

काही वेळेस न उमललेली पोयदेखील भुंगा कुरतडून खातो. ही पोय न उमलता वाळते. त्यामुळे याचा परिणाम नारळाची वाढ आणि उत्पादनावर होतो. नवीन सुई कुरतडली गेल्यामुळे लागण झालेल्या झाडाच्या झावळ्या त्रिकोणी आकारात कात्रीने कापल्यासारख्या दिसतात. या प्रमुख लक्षणावरून या किडीचा प्रादुर्भाव सहज ओळखता येतो. लहान झाडांबरोबर मोठ्या झाडांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. जुलै ते सप्टेंबर या महिन्यांत या भुंग्यांची तीव्रता जास्त आढळते, अशी माहिती चांडक यांनी दिली.

advertisement

धार्मिक कार्यात महत्त्वाचे असलेल्या विड्याच्या पानाचे आरोग्यासाठी आहेत आश्चर्यकारक फायदे

नियंत्रणाचे उपाय

बाग स्वच्छ ठेवणे - कुजलेला पालापाचोळा तसेच तोडलेल्या नारळाच्या खोडांचे अवशेष बागेत ठेवू नयेत. शेणखताची साठवण नारळ बागेत किंवा जवळपास करू नये. शेणखतात आढळणाऱ्या अंडी, अळी आणि कोष या अवस्था वेळोवेळी गोळा करून त्यांचा नाश करावा.

advertisement

शेणखताच्या खड्ड्यावर दर दोन महिन्यांच्या अंतराने 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारिल भुकटी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फसवे खड्डे तयार करा - नारळ बागेमध्ये 60 सें.मी. लांब, 60 सें.मी. रुंद व 60 सें.मी. खोल या आकाराचे फसवे खड्डे तयार करून त्यामध्ये कुजलेला पालापाचोळा, शेणखत भरून घ्यावे. या खड्ड्यांवर 50 टक्के पाण्यात मिसळणारी कार्बारिल भुकटी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे या खड्ड्यात तयार होणाऱ्या भुंग्यांच्या तिन्ही अवस्थांचा नायनाट होईल, असे चांडक यांनी स्पष्ट केले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
‘ही’ कीड नष्ट करते नारळाची संपूर्ण बाग, शेतकऱ्यांनो, तातडीनं घ्या काळजी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल