धार्मिक कार्यात महत्त्वाचे असलेल्या विड्याच्या पानाचे आरोग्यासाठी आहेत आश्चर्यकारक फायदे
- Published by:News18 Marathi
Last Updated:
धार्मिक कार्यात महत्त्वाचे असलेल्या विड्याच्या पानाचे आरोग्यासाठीही मोठे फायदे आहेत.
डोंबिवली, 15 सप्टेंबर : श्रावण महिना संपला असला तरी गणेशोत्सव आता तोंडावर आलाय. गणेश याग असो किंवा सत्यनारायण पूजा सर्व धार्मिक कार्यात विड्याच्या पानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. धार्मिक कार्यात महत्त्वाचे असलेले विड्याचे पान आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. या पानाचे आयुर्वेदात काय महत्त्व आहे? त्याचा आरोग्याला होणारा फायदा काय? कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी हे पान खाताना काळजी घ्यावी याची माहिती डोंबिवलीतले आयुर्वेदिक डॉक्टर महेश ठाकूर यांनी दिलीय.
पचनास उपयुक्त
विड्याचे पान हे पचनास उपयुक्त आहे. त्यामुळे भूक वाढण्यास मदत होते. पोटातील जंत मरतात, तोंड स्वच्छ होते. लाळ निर्माण करणार आणि पाचक स्त्राव वाढवणार पान म्हणून आयुर्वेदात त्याचे वर्णन केले आहे. त्यामुळे जेवणानंतर विड्याचे पान खाण्याची पद्धत आहे.
advertisement
त्रयोदशगुणी विडा म्हणून विड्याच्या पानाकडे पाहिले जाते. असे पान शुभकार्य प्रसंगी दिले जाते. यामध्ये कात, वेलची, केसर, सुपारी, लवंग , खोबरं अशी एकूण 13 प्रकार विड्याच्या पानात टाकले जातात.
हृदय विकरासाठी उपयुक्त
ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे अशा सर्वांसाठी विड्याचे पान उपयुक्त आहे. हा त्रास असलेल्या व्यक्तींनी जेवल्यानंतर विड्याचे पान खावे. यामुळे पचन हलके होईल आणि गॅसेस होणार नाहीत. विड्याच्या पानात व्हिटॅमिन ए भरपूर असून केरोटिनचे प्रमाण अधिक आहे. गळू झाल्यानंतर तो बरा होण्यासाठी विड्याचे पान गरम करून त्याला लावावे हा एक उत्तम आयुर्वेदिक उपाय आहे अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली.
advertisement
विड्याच्या पानाला आयुर्वेदात तांबूल किंवा नागवेल असेही म्हंटले जाते. विड्याचे पान हे उष्ण असल्याने ज्यांची शरीर प्रवृत्ती पित्ताची आहे त्यांनी कमी खावे असा सल्ला डॉ. ठाकूर यांनी दिला आहे.
( टीप : या बातमीतील माहिती तज्ज्ञांचे वैयक्तिक मत आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)
Location :
Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
First Published :
September 15, 2023 9:53 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
धार्मिक कार्यात महत्त्वाचे असलेल्या विड्याच्या पानाचे आरोग्यासाठी आहेत आश्चर्यकारक फायदे