वीज बिलाच्या टेन्शनमधून होईल शेतकऱ्याची सुटका! 'या' सरकारी योजनेला जबरदस्त प्रतिसाद

Last Updated:

भारनियमन आणि वाढते वीज बिल यामुळे शेतकऱ्यांची सोलार पंपला अधिक पसंती मिळत आहे. सराकारी योजनेला मोठा प्रतिसाद मिळतोय.

+
वीज

वीज बिलाच्या टेन्शनमधून होईल शेतकऱ्याची सूटका! 'या' सरकारी योजनेला जबरदस्त प्रतिसाद

बीड, 9 सप्टेंबर: केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. यापैकीच एक पंतप्रधान कुसुम सोलार पंप योजना देखील आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, विजेचा भार कमी व्हावा आणि सौर कृषी पंपाचे प्रमाण वाढावे यासाठी पंतप्रधान कुसुम सोलार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकरी सध्या घेताना दिसत आहेत. राज्यासाठी या योजनेतून एक लाख एवढे उद्दिष्ट ठरविले. मात्र एकट्या बीड जिल्ह्यातून आतापर्यंत एक लाख 40 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्थात शेतकऱ्यांची या योजनेला मोठी पसंती मिळत आहे.
कसा घ्याल या योजनेचा लाभ
पीएम कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात आधी mahaurja.com असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरचण ही वेबसाईट ओपन होईल. उजवीकडे "महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी" हा पर्याय दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
आणि या योजनेचा अधिक माहिती यासाठी लागणारे कागदपत्रे कशाप्रकारे या वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत. यासाठी  https://www.youtube.com/watch?v=CBZU7sDYJio ही युट्युब लिंक देण्यात आली आहे.
advertisement
अनुदान कसं दिलं जातं?
3 एचपी पंप
एकूण किंमत – 1,93,803 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा– 19,380 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -9,690 रुपये
5 एचपी पंप
एकूण किंमत– 2,69,746 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – 26,975 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -13,488 रुपये
advertisement
7.5 एचपी पंप
एकूण किंमत – 3,74,402 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – 37,440 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -18,720 रुपये
या योजनेसाठी पात्रतेचे निकष पुढीलप्राणे
1. पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
2. शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी/ याच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
3. अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी.
मराठी बातम्या/कृषी/
वीज बिलाच्या टेन्शनमधून होईल शेतकऱ्याची सुटका! 'या' सरकारी योजनेला जबरदस्त प्रतिसाद
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement