मुख्यमंत्री शिंदे स्वतःची खुर्चीही देतील : अंधारे
मुख्यमंत्र्यांनी एवढा काही त्याग केलेला आहे की हिंदुत्वासाठी अहोरात्र झगडणार्या कंगना रणौत यांनाही मदत करतील. जर मुख्यमंत्री महोदयांचा सूट पाहिजे असेल तर शिंदेसाहेब गरज पडली तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्चीसुद्धा मेहरबान करतील. त्यांनी त्यासाठी सुद्धा मागे हटू नये आणि हिंदुत्वासाठी त्यांनी ते केलं पाहिजे, अशी खोचक टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. त्या बीडच्या परळी येथे बोलत होत्या.
advertisement
राम मंदिराला गळती : अंधारे
22 जानेवारीला अत्यंत वाजत गाजत आणि जगभरात गाजावाजा करत ज्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम घेतला गेला. त्याच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पहिल्याच पावसाने गळती होते, अशी जी बातमी आली ती बातमी अत्यंत गंभीर आहे. फक्त चिंताजनक नाही तर ती सरकारसाठी कमालीची लज्जास्पद आहे. कारण निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि फक्त करण्यासाठी म्हणून बांधकाम अपूर्ण असताना घाई घाईने ज्या पद्धतीने त्यांनी त्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम की आज मुख्य गाभाऱ्यामध्ये पहिल्याच पावसात अजून पावसाळा पूर्ण व्हायचाय पण पहिल्या पावसात जर ती गळती होत असेल तर हे मात्र फार वाईट आहे, अशी टीका अंधारे यांनी केला.
वाचा - कंगनाच्या पहिल्याच मागणीवर संजय राऊत भडकले; म्हणाले 'श्रीमतीजींना..'
माजी आमदार के. पी. पाटील यांच्या कारखान्यावरील कारवाई चुकीची : अंधारे
के पी पाटलांच्या संपत्तीच्या संबंधाने होत असलेल्या चौकशी या निश्चितपणे निंदनीय आहेत. मला अशी माहिती मिळाली, की के पी पाटील हे परतीच्या मार्गावर आहेत. आणि आदरणीय पवार साहेबांकडे पुन्हा एकदा स्वगृही जाण्याचे वेध लागलेले आहेत. म्हणून त्या पद्धतीच्या कारवाया होत आहेत. कारण याआधी आपण बघितलेलं आहे की असं मुश्रीफ साहेबांवर फार जोरदार ईडी कारवाई करत होती. परंतु, जसे ही जाण्याचं कबूल केलं आणि दादांनी भाजपसोबत घरोबा करण्याचं ठरवलं. साहेबांच्या कारवाया थांबवल्या गेल्या. आता के. पी. पाटील यांच्यावरही असाच दबाव आणला जात असेल तर ते निंदनीय आहे.