श्रीरामपूर, अहिल्यानगर : एकीकडे पंढरपूरकडे पालख्या जात असताना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे एका बेकरीमध्ये गोमांस विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे बेकरीतून पाव आणि इतर खाद्य पदार्थ खरेदी करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या गोरक्षकांनी बेलापूरमधील एका बेकरीत गोमांस विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत छापा टाकला असता या छाप्यादरम्यान धक्कादायक बाब समोर आली आहे.
advertisement
बेकरीमध्ये गोमांस विक्री केली जात होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई तरून बेकरीमध्ये गोमांस विक्री करत असलेल्या शकील कुरेशी याला ५० किलो गोमांसासह ताब्यात घेतले. मात्र बेकरीत सुरू असलेला हा सर्व समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
बेलापूर येथे रामगिरी महाराजांची पालखी येत असताना काही लोकांनी जाणून बुजून बेकरीत गोमांस विक्री केली. यामाध्यमातून त्यांनी पावित्र्य भंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केले. आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन यावेळी कारवाई केली. यापुढे असे गोमांस विक्रीचे प्रकरण यापुढे उघडकीस येणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली.
साधू संतांच्या पवित्र भूमीत काही समाजकंटकांनी हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचविण्याचा प्रयत्न केला. बेलापूर आणि परिसरात अवैध गोमांसविक्री होत आहे. आता प्रशासनाने कारवाई केली आहे. परंतु यापुढे असे प्रकार उघडकीस येणार नाही, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले.
दरम्यान, या कारवाईमुळे बेकरीतून तयार होणारे आणि विकले जाणारे पाव आणि इतर खाद्य पदार्थ गोमांसमिश्रित होते का? अशी भीती नागरिकांनी बोलून दाखवत त्यांच्यात संतापाची लाट आहे.
