TRENDING:

Crime : सोशल मीडियावर मेसेज,मैत्री होताच लॉजवर न्यायची, अंघोळीच्या बहाण्याने...घटनाक्रम पाहून पोलिसांना फुटला घाम

Last Updated:

एक तरूणी धनदाडग्यांना सोशल मीडियावर मेसेज करायची. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना लॉजवर बोलवायची. यानंतर ती पुढे जे करायची ते वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकरणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Crime News : सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेकांचे मेसेज येत असतात,त्यातचे काही मेसेज ओळखीतल्या लोकांचे तर काही मेसेज अनोळखी व्यक्तींचे असतात.अशाच अनोळखी व्यक्तीच्या मेसेजला रिप्लाय करून काही श्रीमंतं लोक हनीट्ऱॅपच्या जाळ्यात फसली आहेत.या घटनेत एक तरूणी धनदाडग्यांना सोशल मीडियावर मेसेज करायची. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना लॉजवर बोलवायची. यानंतर ती पुढे जे करायची ते वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकरणार आहे. या प्रकरणात एका फॅशन डिझायनर तरूणीला अटक करण्यांत आली आहे.तसेच ती कशाप्रकारे श्रीमंत व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढायची? आणि हे संपूर्ण घटनाक्रम नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
crime news
crime news
advertisement

खरं तर ही घटना बेळगावची आहे.या घटनेत एक फॅशन डिझायनर तरूणी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून श्रोमंत व्यक्तींना जाळ्यात ओढायची. त्यानंतर त्यांना हनीट्रपमध्ये फसवून त्यांची फसवणकू करायची. या घटनेचा आता बेळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी दीपा अवतगी (वय ३३, रा. महालिंगपूर, जि. बागलकोट)या व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेला महिलेला अटक करण्यात आली आहे.तसेच तिच्यासोबत काम करणारा शिवानंद मठपती (रा. हुक्केरी, जि. बेळगाव) हा पोलिसांना चकवा देत फरार झाला आहे.

advertisement

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार आरोपी शिवानंद मठपती हा श्रीमंत व्यक्तीची माहिती गोळा करायचा.त्यानंतर ही माहिती गोळा करून तो दीपा अवतगीला द्यायचा.श्रीमंत व्यक्तींची संपूर्ण डिटेल मिळताच दीपा सोशल मीडियावर त्या व्यक्तींचा शोध घ्यायची आणि मग त्यांना इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियावरून त्यांच्याशी ओळख वाढवत असे. काही दिवस गप्पा मारून विश्वास संपादन केल्यानंतर ती त्यांना बेळगाव शहरातील एका लॉजमध्ये भेटण्यास बोलावत असे.

advertisement

लॉजमध्ये आल्यानंतर दीपा संबंधित व्यक्तीला आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये पाठवायची.त्यानंतर बाहेरून दरवाजा बंद करून मोबाईल, रोकड आणि गाडीच्या चाव्या घेऊन ती पसार व्हायची. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरून फोन करून पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी मागायची.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तोट्यात जाणाऱ्या शेतीला आधुनिक पद्धतीनं पिकवलं, 60 लाखांचा झाला नफा, अनुराग यांनी कसा केला प्रयोग?
सर्व पहा

या प्रकरणी अनेक तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी तपासांची चक्रे फिरवत शोध सूरू केला होता. या तपासा दरम्यान दीपाच्या काही हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.अखेर टिळकवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत दीपाला अटक केली. तिच्याकडून सुमारे 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, फरार असलेल्या शिवानंद मठपतीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.या घटनेने पोलिस देखील चक्रावले आहेत तसेच या घटनेचा तपास सूरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Crime : सोशल मीडियावर मेसेज,मैत्री होताच लॉजवर न्यायची, अंघोळीच्या बहाण्याने...घटनाक्रम पाहून पोलिसांना फुटला घाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल