16553/ 16554 बेंगळुरू- लोकमान्य टिळक टर्मिनस- बेंगळुरू अशा नव्या एक्सप्रेसची घोषणा करण्यात आली होती. जी ट्रेन 9 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली होती. ट्रेन 16553 ही ट्रेन शनिवार आणि मंगळवारी रात्री 8:35 वाजता बेंगळुरूहून सुटेल, ही ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री 8:40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे. तर, 16554 ही ट्रेन रविवार आणि बुधवारी रात्री 11:15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 वाजता बेंगळुरूला पोहोचेल. ही एक्सप्रेस हुबळीसह पुणे असे मुख्य 14 थांबे आहेत. 17 एलएचबी कोचसह चालणार आहे. या ट्रेनच्या देखभालीचे काम बेंगळुरूमध्ये केले जाणार आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्ड केएसआर बेंगळुरू आणि सीएसएमटी मुंबई दरम्यान दुरांतो एक्सप्रेसच्या विचारात आहे, जी तुमकुरु, दावणगेरे, हुबळी, बेलागवी, मिरज आणि पुणे मार्गे मुंबईमध्ये येईल. ही एक्सप्रेस टू टायरमध्ये चालवली जाणार आहे, या ट्रेनच्या देखभालीचे काम बेंगळुरूमध्ये केले जाणार आहे.. अंदाजे वेळापत्रकानुसार ही ट्रेन केएसआर बेंगळुरूहून दुपारी 04:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. तर, सीएसएमटी मुंबईहून दुपारी 03:00 वाजता सुटेल आणि सकाळी 09:30 वाजता केएसआर बेंगळुरूला पोहोचेल.
दुरांतो एक्सप्रेस मर्यादित थांब्यांसाठी, तिकिटाच्या पैशात प्रवाशांना खाणं- पिणं आणि सर्वाधिक किंमतीसाठी ओळखली जाते. बेंगळुरू ते मुंबई प्रवासासाठी 3AC बर्थची किंमत सुमारे 2,500 रुपये असण्याचा अंदाज आहे, जो एक प्रीमियम परंतु परवडणारा प्रवासाचा पर्याय पर्यटकांना देतो. दुरांतो एक्सप्रेसबद्दल चर्चा सुरू असताना, बेंगळुरूचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष कुमार सिंग यांच्याकडून या रेल्वे सेवेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. त्यांनी स्पष्ट केले की, आठवड्यातून दोनदा धावणारी सुपरफास्ट सेवा रद्द केलेली नाही.
दरम्यान, झोनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटीचे माजी सदस्य प्रकाश मंडोथ यांनी असे मत व्यक्त केले की, बेंगळुरू- मुंबई मार्ग 18 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ट्रेन ही खूप दिवसांपासूनची गरज आहे. कर्नाटक रेल्वे वेदिकेचे सदस्य केएन कृष्णा प्रसाद यांनी या दोन प्रमुख शहरांमधील जलद आणि अधिक परवडणाऱ्या खर्चावर आमचा भर आहे.
