प्रेरणा श्यामराव खोब्रागडे असं हत्या करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याच्या पंचवटी येथील रहिवासी होती. ती आपल्या मामाच्या गावा साकोली तालुक्यात नर्सिंगचं शिक्षण घेत होतं. बुधवारी सकाळी अचानक तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेने परिसरात आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दीड वर्षांपासून प्रेरणा साकोली येथे आपल्या मामाच्या घरी राहून नर्सिंगचा अभ्यास करत होती. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ती खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तातडीने तिला उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात प्रेरणाने "मी स्वतः आत्महत्या करते" असा स्पष्ट उल्लेख केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रेरणाच्या निधनाने तिचे कुटुंब आणि नातेवाईक प्रचंड दु:खात आहेत. एका होतकरू विद्यार्थिनीने अचानक जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. साकोली पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.