Bhiwandi Accident News : नरेश पाटील, प्रतिनिधी भिवंडी : दिवाळी अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर आली आहे. असे असताना भिवंडीच्या पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण पाटील कुटुंबियातील एका तरूणाचा दुदैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनोद पाटील असे या (28) वर्षीय तरूणाचे नाव आहे. या घटनेने पाटील कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पाटील हा तरूण पडघा वरून भिवंडीच्या दिशेने दुचाकीने प्रवास करत होता. यावेळी निंबवली नाक्यावर त्याच्या दुचाकीला अपघात झाला होता.एका भरधाव कंटेनरने त्याला चिरडलं होतं.त्यामुळे या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. खरं तर तो घरी जायला निघाला होता, पण त्याआधीच त्याला मृत्यूने गाठलं होतं.
विनोद पाटील हा व्यवसायाने इंजिनिअर होता. तो मुळचा कर्नाटकचा रहिवासी होता. आणि कशेळी येथे नातेवाईकांकडे राहत होता. यावेळी विनोद पाटील येवईच्या रस्त्याने येत घरी येत असताना त्याचा मृत्यू झाला होता. एका भरधाव कंटेनरने त्याला चिरडल होतं त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता.या घटनेनंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
या अपघातानंतर कंटनेर चालक फरार झाला आहे की पोलिसांनी त्याला पकडलं आहे?याची अद्याप काहीच माहिती मिळू शकलेली नाही आहे. पण या घटनेने परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.पण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक कोंडी सोडवली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.