त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट समोरासमोर भिडल्याने दगडफेक करण्यात झाली. यावेळी पोलिसांनी लाठीमार करीत जमाव पांगवला. त्यानंतर पहाटे विलास पाटील यांच्या बंगल्यात बसलेल्या 36 जणांना ताब्यात घेतले तर आमदार महेश चौघुले गटातील ८ जणांना ताब्यात घेऊन भिवंडी न्यायालयात हजर केले.
या राड्यानंतर रात्रभर पोलिसांनी केलेल्या कारवाईत आमदार महेश चौघुले गटाचे भावेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारी वरून माजी महापौर विलास पाटील यांच्यासह 100 ते 150 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विलास पाटील गटाचे हर्ष वरळीकर यांच्या तक्रारीवरून चैतन्य पुल्लेवार आणि इतर १५ ते २० जणांविरोधात निवडणूक जिंकल्याचा राग मनात ठेऊन रत्नदीप बंगला येथे हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
advertisement
तिसरा गुन्हा राजू तडका यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाजप उमेदवार रितेश टावरे आणि त्यांचे १०० ते १५० अज्ञात लोकांविरोधात घरावर हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांकडून निजामपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी विलास पाटील आणि त्यांचे १०० ते १५० तर भाजपा उमेदवार रितेश टावरे आणि त्यांचे ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भिवंडी महापालिकेचा निकाल काय लागला?
भिवंडी महापालिकेच्या २३ प्रभागातील ९० जागांसाठी निवडणूक संपन्न झाली. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या निकालात काँग्रेसला सर्वाधिक ३० जागांवर यश मिळाले तर त्याखालोखाल भाजपने २२ जागा जिंकल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १२ जागांवर यश मिळाले आहे. कोणार्क आघाडीला ४ जागांवर यश मिळाले तर भिवंडी विकास आघाडी ३ जागांवर जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेस १२ तर अपक्ष उमेदवार एका जागेवर जिंकला.
