अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओमुळे राज्याला धक्का बसलाय. त्यातच खरातचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करणं आता अनेकांना महागात पडू लागलंय. खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वॉलमन ग्रुप. शहरात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअर केल्याचा आरोप आहे. त्या ग्रुपमधील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण ग्रुप अॅडमिनने सेटिंग बदलून सर्वांनाच अॅडमिन केल्यामुळे सर्व 40 वॉलमन पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत. चौकशीच्या भीतीने कर्मचारी समोर येत नसल्यानं नाशिक शहराचा पाणीपुरवठा धोक्यात आलाय.
advertisement
काय सांगतो कायदा?
महिलांची गोपनियता भंग होऊ नये यासाठी कठोर कायदे आहेत. आणि त्यामुळेच पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि आयटी अॅक्ट म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. आयटी अॅक्ट मधील कलम 67, 67A नुसार अश्लील, लैंगिक सामुग्री प्रसारित करणे गुन्हा आहे. भारतीय न्याय संहितेनुसार गोपनीयतेचा भंग, महिलांच्या सन्मानावर आघात आहे. त्यामुळे फॉरवर्ड करणे देखील गुन्हा आहे. कायद्यासमोर “फक्त शेअर केलं” हा बचाव चालत नाही.
गुगल सर्चमध्ये सर्वाधिक काय आहे ट्रेंडमध्ये?
पोलिसांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. कोणतीही आक्षेपार्ह सामग्री फॉरवर्ड करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. दरम्यान ‘अशोक खरात’ हे नाव गुगल सर्चमध्ये टॉप ट्रेंडमध्ये पोहोचलंय. 58 व्हिडीओ, खरात न्यूज, रूपाली चाकणकर, अशोक खरात मंदीर, अशोक खरात फॅमिली, अशोक खरातची कास्ट, अशोक खरातचा दरबार, असे की वर्डस् ट्रेंडिंग होत आहेत. अशोक खरात कोण आहे ? त्याची कोणत्या राजकीय नेत्यांशी जवळीक होती? हे देखिल नेटिझन शोधत आहेत.
सोशल मीडियावर केलेली चूक 74 जणांना महागात
सोशल मीडियावर केलेली चूक वॉलमनसह 74 जणांना महागात पडली आहे. त्यातून धडा घेत सर्वांनीच नेटिकेट्सचं पालन करण्याची गरज आहे. कारण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप हे डिजिटल पब्लिक स्पेस आहेत. व्हॉट्सअॅपवर अॅडमिनवर कन्टेन्ट कंट्रोल करण्याची जबाबदारी असते. चुकीचा कन्टेन्ट रोखला नाही तर तो निष्काळजीपणा मानला जातो. एक फॉरवर्ड कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. कठोर कायदा असल्यानं चुकीचं फॉरवर्ड करू नका. आणि सुरक्षित राहा.
