TRENDING:

Bhumi Abhilekh Bharti: भूमि अभिलेख विभागात भरती, मिळणार 63,200 रूपये पगार; 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

Last Updated:

Bhumi Abhilekh Bharti 2025: भूमी अभिलेख विभागामध्ये नोकरभरती आहे. काही शेकडो पदांसाठी राज्य शासनाकडून नोकर भरती केली जाणार आहे. भूमि अभिलेख विभागामध्ये तब्बल 903 रिक्त पदे भरण्यासाठीची अधिकृत जाहिरात काढण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अनेक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्या साठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. भूमी अभिलेख विभागामध्ये नोकरभरती आहे. काही शेकडो पदांसाठी राज्य शासनाकडून नोकर भरती केली जाणार आहे.
Bhumi Abhilekh Bharti: भूमि अभिलेख विभागात भरती, मिळणार 63,200 रूपये पगार; 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
Bhumi Abhilekh Bharti: भूमि अभिलेख विभागात भरती, मिळणार 63,200 रूपये पगार; 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
advertisement

भूमि अभिलेख विभागामध्ये तब्बल 903 रिक्त पदे भरण्यासाठीची अधिकृत जाहिरात काढण्यात आली आहे. पात्र अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र आणि उत्सुक असलेल्या उमेदवारांनी दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती बद्दलची आवश्यक माहिती, PDF जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज लिंक सुद्धा देण्यात आली आहे.

advertisement

भूमी अभिलेख विभागामध्ये भूकरमापक पदासाठी 903 इतक्या जागांसाठी नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही नोकर भरती ऑनलाइन पद्धतीने केली जात असून याची परीक्षा देखील ऑनलाईनच पद्धतीने घेतली जाणार आहे. भूकरमापक पदासाठी 10वी उत्तीर्ण, मान्यता प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा माध्यमिक शाळेमध्ये परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बंद होणार होती ZP शाळा, आज ठरली जगातली नंबर वन School, पाहावी अशी स्टोरी! Video
सर्व पहा

मराठी टायपिंग 30 WPM आणि इंग्रजी टायपिंग 40 WPM स्पीड असलेले सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. 01 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेची अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर आहे. भूमी अभिलेख विभागामध्ये नोकरभरतीसाठी असलेली वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्षे इतकी असणार आहे. पुणे, कोकण, मुंबई, नाशिक, छ. संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर नागपूर विभागामध्ये अर्जदार अर्ज करू शकणार आहेत. मागासवर्गातील उमेदवारांना 900 रूपये इतके अर्ज शुल्क आहे, खुल्या प्रवर्गासह इतरत्र उमेदवारांना 1000 रुपये इतके अर्ज शुल्क असणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रुपये पगार दिला जाणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhumi Abhilekh Bharti: भूमि अभिलेख विभागात भरती, मिळणार 63,200 रूपये पगार; 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल