याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव-दिंडोशीमधील रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत बसच्या फेऱ्या पुरेशा नाहीत. ही बाब लक्षात घेऊन बेस्टने या परिसरासाठी मोठ्या बस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र शासनाच्या स्क्रॅप धोरणामुळे मिडी बस हटवण्यात येणार आहेत. या बसच्या जागी आता 13 नवीन मोठ्या बस गोरेगावच्या रस्त्यांवर धावणार आहेत. यामुळे 346 व 646 (नागरी निवारा), 327 (मंत्री पार्क) या मार्गांवरील प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
advertisement
Csmt Station : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकात मोठा बदल; 3 महिने प्लॅटफॉर्म बंद
दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी दिंडोशी-गोरेगावमध्ये मोठ्या बस चालवण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. मोठ्या बसमध्ये दोन मिडी बसइतके प्रवासी बसू शकतील. त्यामुळे गर्दी आणि रांगा दोन्हीही कमी होईल.