TRENDING:

'हीच तुझी लायकी', धाराशिवमध्ये भाजपकडून बॅनरबाजी, ओमराजे अन् राणा पाटील यांच्यातील वाद पेटणार!

Last Updated:

धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: मागील अनेक दिवसांपासून धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात वाद सुरू आहे. आता पुन्हा एकदा या दोन नेत्यांमध्ये धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. आता भाजपकडून शहरात अनेक ठिकाणी बॅनर लावून खासदार ओम राजेनिंबाळकर यांची लायकी काढली आहे. यात त्यांनी 'हीच तुझी लायकी' असा हॅशटॅग देखील वापरला आहे. तसेच 'रडू नको बाळा' असं म्हणत ओम राजेनिंबाळकरांना डिवचलं आहे. विशेष म्हणजे 'लायकी' या शब्दावरून आधीच राणा पाटील आणि ओमराजे यांच्यात वाद झाला होता.
ओमराजे निंबाळकर-राणा जगजीतसिंह पाटील
ओमराजे निंबाळकर-राणा जगजीतसिंह पाटील
advertisement

नेमका वाद काय आहे?

धाराशिव शहराअंतर्गत रस्त्याच्या विकास निधी थांबवल्याचा वाद धाराशिव शहरात पेटला असून पक्षप्रवेश करतो, असे सांगून शहरातील विकास निधी पालकमंत्र्याकडून थांबून घेतला, हीच तुझी लायकी म्हणत धाराशिव शहरात चौका चौकात भारतीय जनता पार्टी कडून बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

advertisement

लायकी शब्दावरून काही दिवसापूर्वी याच मुद्याला घेऊन राणा पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात जुंपली होती. आता चक्क भाजपने चौका चौकात बॅनर लावत ओमराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर विरोधकाच्या अप्रचाराला पालकमंत्री बळी पडले आणि त्यांनी विकास निधीला स्थगिती दिली. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे.

advertisement

बॅनरवर नक्की काय आहे?

पक्षप्रवेश करतो असे सांगून पालकमंत्र्याकडे भीक मागून.... धाराशिवचा विकास निधी थांबवण्याचा प्रयत्न करणारा... हीच तुझी लायकी... आशयाचे बॅनर धाराशिव शहरात लागले आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पवना नदीचं आरोग्य धोक्यात, नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास, कारण काय?
सर्व पहा

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये 18 महिन्यांपूर्वी 170 कोटींच्या कामाच्या विकासनिधीवर स्थगिती आणण्यात आली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर दोन दिवसांपूर्वी ही स्थगिती उठवण्यात आली. आमदार राणा पाटील यांच्या प्रयत्नातून ही स्थगिती उठवली होती. पण अवघ्या दोन दिवसात धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः नगर विकास खात्याकडे तक्रार करून या कामावर पुन्हा स्थगिती आणली. याच मुद्द्यावरून महायुती मधील पालकमंत्री प्रताप सरनाईक व भाजप आमदार राणा पाटील यांच्यात वाद सुरू झाला होता. याच वादात आता बॅनर लावत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही निशाणा साधला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'हीच तुझी लायकी', धाराशिवमध्ये भाजपकडून बॅनरबाजी, ओमराजे अन् राणा पाटील यांच्यातील वाद पेटणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल