TRENDING:

संजयकाकांना पक्षात घेणार? चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांना आमची ऑफर नाही, आम्ही दुसऱ्या पाटलांमागे!

Last Updated:

Chandrakant Patil: संजय काकांना आमची ऑफर नसून ते आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत काम करतात. त्यांचे तिकडेच पुनर्वसन केले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली : सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पूर्णविराम दिला आहे. संजयकाका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. तिथेच त्यांचे पुनर्वसन केलं पाहिजे, असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
advertisement

संजयकाका पाटील हे आमचे जुने नेते आणि जवळचे मित्र असल्यामुळे त्यांचे पुनर्वसन राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व्हावे, यासाठी आम्ही अजित पवारांना मदत करू,अशी भूमिका मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट करत गेल्या काही दिवसांपासून संजय काका पाटलांचा भाजपामध्ये प्रवेश होणार, या सुरू असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिलाय. ते सांगलीमध्ये बोलत होते.

advertisement

भाजपमध्ये येण्याची आमची ऑफर सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटलांना!

त्याचबरोबर सांगलीचे विद्यमान अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली.विद्यमान खासदार विशाल पाटील तरूण तडफदार आहे. ते संवेदनशील आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांची जाण आहे. प्रश्न सोडविण्याकडे त्यांचा कल असतो. असा नेता भाजपमध्ये असला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणारच. ते अपक्ष खासदार असल्याने ते भाजपमध्ये थेटपणे प्रवेश करू शकणार नाहीत. त्यांना भाजपचे सहयोगी म्हणून यावे लागेल. परंतु त्यांनी भाजपमध्ये यावे, ही माझी प्रामाणिक भावना आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

advertisement

विशाल पाटील यांना मंत्री व्हायचंय, पक्षबदलाचीही तयारी!

सांगली लोकसभेच्या तिरंगी लढतीत अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडून आले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील असतानाही काँग्रेस पक्षाने पडद्यामागून विशाल पाटील यांचे काम करून त्यांना निवडून आणले पण त्याच विशाल पाटील यांना मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. त्यासाठी त्यांनी पक्षबदलाची तयारी देखील दर्शवली आहे. शेवटी राजकीय प्रवास हा परिस्थितीनुरूप असतो. मतदारसंघाची कामे व्हावी लागतात. राजकारणात काम करत असताना आपला आसपासचा भाग, जिल्हा पुढे न्यायचा असतो, अशी पुष्टीही विशाल पाटील यांनी जोडली. 'मतदारसंघाचा विकास' हे लेबल लावून अनेक नेते पक्षबदल करतात, तशाच प्रकारची कारणे सांगून पक्षबदल करण्यासाठी विशाल पाटील यांनी मन बनवले आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जातोय.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संजयकाकांना पक्षात घेणार? चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांना आमची ऑफर नाही, आम्ही दुसऱ्या पाटलांमागे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल