महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषेच्या वादावर एक पाऊल पुढे टाकत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांनाही उघड आव्हान दिले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, "मुंबईत हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रातील उर्दू भाषिकांना मारहाण करा. स्वतःच्या घरात कुत्राही सिंह असतो. कोण कुत्रा आहे आणि कोण सिंह आहे ते तुम्हीच ठरवा." भाजप खासदार एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी हे आव्हान मराठी भाषेतही पोस्ट केले.
advertisement
याआधीही निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राच्या भाषिक राजकारणाचा संबंध काश्मिरी पंडितांशी जोडला होता. "मुंबईतील शिवसेना ठाकरे गट, मनसे राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार आणि काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावणारा सलाउद्दीन, मौलाना मसूद अझहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाला हिंदू असल्याने छळले गेले आणि दुसरा हिंदीमुळे अत्याचार करत आहे?", असा सवाल केला होता.
निशिकांत दुबे यांच्या आधी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनीही मनसे कार्यकर्त्यांना आव्हान देत उर्दू भाषिकांना मराठी बोलायला लावण्याची मागणी केली होती. मुस्लिम मराठी बोलत नसल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. एवढेच नाही तर त्यांनी ठाकरे बंधूंवर हिंदू समाजात फूट पाडण्याचा आरोपही केला होता.