TRENDING:

BMC Election : कुठं लेक, कुठं सून, कुठं मेव्हणा, बीएमसी निवडणुकीत ४३ जागांवर घराणेशाही, पाहा यादी

Last Updated:

BMC Election interested Candidates: कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचा दावा सगळ्याच राजकीय पक्षांनी केला. मात्र, दुसरीकडे आता अनेकांनी आपल्या घरातच उमेदवारी कायम ठेवल्याचे चित्र दिसून आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता अनेक प्रभागांतील लढतींचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून ‘कार्यकर्त्यांची निवडणूक’ लढवली जात असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र घराणेशाहीचं वर्चस्व पुन्हा एकदा उघडपणे समोर आलं आहे.
कुठं लेक, कुठं सून, कुठं मेव्हणा, नातीगोतीमुळे बीएमसी निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..पाहा यादी
कुठं लेक, कुठं सून, कुठं मेव्हणा, नातीगोतीमुळे बीएमसी निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..पाहा यादी
advertisement

एका बाजूला घराणेशाहीला विरोध करणाऱ्या नेत्यांची भाषणं सुरू असताना, दुसऱ्या बाजूला त्यांच्याच घरातील उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचं चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे घराणेशाहीवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या एका आमदाराच्या घरातून तब्बल तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळे भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

फक्त भाजपच नव्हे, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह इतर पक्षांतही नातेवाईकांना उमेदवारी देण्याचा सिलसिला सुरूच आहे. उपलब्ध माहितीनुसार मुंबईतील तब्बल ४३ जागांवर विविध पक्षांच्या नेत्यांची मुलं, मुली, पत्नी, भाऊ किंवा इतर नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची नसून, ‘कुटुंबीयांची’ झाली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

advertisement

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...

या पार्श्वभूमीवर अनेक प्रभागांत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याने अंतर्गत असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत केवळ पक्षांची नव्हे, तर थेट नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नातेवाईक उमेदवारांच्या विजय-पराजयावर संबंधित नेत्यांचं राजकीय वजन ठरणार असल्याने, मुंबई महापालिका निवडणूक यावेळी अनेक अर्थांनी निर्णायक ठरण्याची चिन्हं आहेत.

advertisement

>> साटमांचा मेव्हाणा, घोसाळकरांचा लेक, दरेकरांचा भाऊ...बीएमसीच्या रिंगणातील नातीगोतींची यादी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

नेत्याचे नाव पक्ष उमेदवार नाते
1 विनोद घोसाळकर उद्धवसेना तेजस्वी घोसाळकर सून
2 आ. प्रवीण दरेकर भाजप प्रकाश दरेकर भाऊ
3 ज्ञानमूर्ती शर्मा भाजप संगीता शर्मा पत्नी
4 जया तियाना भाजप तेजिंदर सिंग तियाना मुलगा
5 समीर देसाई भाजप रंजून समीर देसाई पत्नी
6 दिलीप पटेल भाजप संदीप पटेल मुलगा
7 डॉ. भारती लवेकर भाजप योगीराज दाभाळकर भाचा
8 रघुनाथ कुलकर्णी भाजप सायली कुलकर्णी मुलगी
9 अमित साटम भाजप रोहन राठोड मेहुणा
10 किरीट सोमैय्या भाजप नील सोमैय्या मुलगा
11 सुरेखा लोखंडे भाजप रोहिदास लोखंडे पती
12 राज पुरोहित भाजप आकाश पुरोहित मुलगा
13 राहुल नार्वेकर भाजप हर्षिता नार्वेकर भावजय
14 राहुल नार्वेकर भाजप मकरंद नार्वेकर भाऊ
15 राहुल नार्वेकर भाजप गार्गी शिवलकर बहीण
16 रवींद्र वायकर शिंदेसेना दीप्ती पोतनीस-चावरेकर मुलगी
17 अशोक पाटील शिंदेसेना रुपेश पाटील मुलगा
18 दिलीप लांडे शिंदेसेना शैला लांडे पत्नी
19 संजय तुर्डे शिंदेसेना मीनल तुर्डे पत्नी
20 सदा सरवणकर शिंदेसेना प्रिया सरवणकर नृत्या मुलगी
21 सदा सरवणकर शिंदेसेना समाधान सरवणकर मुलगा
22 विनोद घोसाळकर उद्धवसेना सौरभ घोसाळकर मुलगा
23 माधुरी भोईर उद्धवसेना योगेश भोईर पती
24 सुनील प्रभू उद्धवसेना अंकिता प्रभू मुलगी
25 हारून खान उद्धवसेना सबा खान मुलगी
26 विश्वनाथ महाडेश्वर उद्धवसेना पूजा महाडेश्वर पत्नी
27 विनायक राऊत उद्धवसेना योगेश राऊत मुलगा
28 श्रीकांत सरमळकर उद्धवसेना हरी शास्त्री जावई
29 संजय दीना पाटील उद्धवसेना राजोल पाटील मुलगी
30 प्रकाश फातर्फेकर उद्धवसेना सुप्रदा फातर्फेकर मुलगी
31 सुनील शिंदे उद्धवसेना निशिकांत शिंदे भाऊ
32 आशिष चेंबूरकर उद्धवसेना प्रज्ञा चेंबूरकर पत्नी
33 मनोज जामसुतकर उद्धवसेना सोनम जामसुतकर पत्नी
34 अशोक धात्रक उद्धवसेना अजिंक्य धात्रक मुलगा
35 ॲड युसूफ अब्राहानी सपा अमरीन अब्राहानी जावई
36 नवाब मलिक राष्ट्रवादी (अप) कप्तान मलिक भाऊ
37 नवाब मलिक राष्ट्रवादी (अप) डॉ. सईदा खान बहीण
38 कप्तान मलिक राष्ट्रवादी (अप) बुशरा मलिक सून
39 अस्लम शेख काँग्रेस कमर जहाँ सिद्दिकी बहीण
40 अस्लम शेख काँग्रेस हैदरअली शेख मुलगा
41 मोहसीन हैदर काँग्रेस मेहेर हैदर पत्नी
42 चंद्रकांत हंडोरे काँग्रेस प्रज्योती हंडोरे मुलगी
43 दीपक काळे काँग्रेस आशा काळे पत्नी
44 विनोद घोसाळकर उद्धवसेना सौरभ घोसाळकर मुलगा

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election : कुठं लेक, कुठं सून, कुठं मेव्हणा, बीएमसी निवडणुकीत ४३ जागांवर घराणेशाही, पाहा यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल